आपल्याला सर्वजण सांगतात की मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. म्हणजे प्रत्येकाने (ज्याला मतदानाचा अधिकार आहे त्याने) हे कर्तव्यनिभावले पाहिजे. दान हे आपल्या (भारताच्या) संस्कृतीत एक पवित्र कर्तव्य म्हणून मान्य केले आहे. सक्षम व्यक्तिने पात्र व्यक्तिला दानदिले पाहिजे हे आपण आपल्या इतिहासापासून, शिकवणीतून शिकलो आहोत.