मनावर ताबा ठेवला पाहिजे |
त्याला जोड शिक्षेची दिल्यास पूर्णपणे ते साध्य होईल. आपणासर्वांचा अनुभव आहे की, शिक्षा देणारी यंत्रणा भ्रष्ट असल्यावर काय होते. यावर उपाय शोधलाच पाहिजे. यंत्रणा भ्रष्ट असण्यामागे दंडगोळा करण्याचा अधिकार हा प्रमुख कारण आहे. तसेच दंड न आकारता तह करण्याची वृत्ती हे दुसरे कारण आहे. या दोन्हीवर असाउपाय पाहिजे की, नियम तोडणारांना शिक्षा झालीच पाहिजे व दंड जागेवर भरण्याऐवजी अशी यंत्रणा पाहिचे की तेथे पोलिसांशी थेटसंबंध नसावा. माझा उपाय असा की, निदान सर्व चौकांत छायचित्र घेणारी यंत्रणा असावी व तिचा मागोवा एका केंद्रात घेतला जावा. यायंत्रणेने प्रत्येक ठिकाणी नियम मोडणाराला पकडल्याची नोंद पुराव्यासहित ठेवावी. पोलिसाने नियम मोडणाऱ्याला पकडल्यावरत्याचा वाहनचालकाचा परवाना ताब्यात घ्यावा व त्याला पोहोंचपावती द्यावी. वाहनचालकाने दंडाची रक्कम ठरवून दिलेल्या बँकेमध्येठरवलेल्या खात्यात भरावी व त्याबद्दलचा पुरावा पोलिसयंत्रणेच्या ठरवून दिलेल्या कार्यालयात पाठवावा. दंड भरल्याचा पुरावामिळाल्यावर पोलिस कार्यालयाने वाहनचालकाचा परवाना त्याच्या पत्त्यावर पोहोचवावा. यातील प्रत्येक स्टेपकरिता ठराविक अवधीनिश्चित करावा. त्याचबरोबर नियंत्रणकक्षातील नोंदी व दंड यांचा आढावा घ्यावा. त्यामध्ये त्रृटी सापडल्यास संबंधित पोलिसाला शिक्षाकरावी.
No comments:
Post a Comment