![]() |
| वाहतुककोंडी |
सकाळसमूहाने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. सध्या पुण्यात लोकल ट्रेनची
काही ठिकाणची व मर्यादीत वेळेतील सेवा सोडली तर रस्त्यावरील वाहतुकीला पर्याय नाही.
सार्वजनिक वाहतुक सक्षम नसल्यामुळे नागरिकांचा स्वतःच्या वाहनावरच विश्वास आहे. सकाळ
समूहातर्फे एक दमदार पाऊल उचलले जात आहे ते सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्याचे
तसेच लोकांचा विश्वास निर्माण करण्याचे. बसस्थांब्यापासून घरी व कार्यालयात जाण्याकरिता
ऑटो रिक्षा चालकांनी कंबर कसली आहे. त्याला नागरिक व निरनिराळ्या संस्था तसेच गट, एकजुटीने
सहाय्य करत आहेत व सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.
जर 1 नोव्हेंबर 2012 चा प्रयोग यशस्वी झाला तर तो प्रयोग रोज राबविण्याकरिता
दरवाजे उघडले जातील. नागरिक जर सार्वजनिक वाहुतक व्यवस्था वापरू लागले तर खाजगी वाहने
रस्त्यावर उतरणार नाहित व रस्त्यावरील कोंडी पूर्णपणे संपली नाही तर निदान कमी
होईल. सध्याचे रस्ते पुरेसे वाटू लागतील.


















































