To read
in English please scroll down
हिंदी
में पढ़ने के लिये नीचे स्क्रोल किजिये।
मराठीत येथे
वाचा.
भारतामध्ये वैयक्तिक एकलेपणा पेक्षा सुरक्षेला जास्त महत्व दिले
जाते. परंतु, पाश्च्यात्य प्रभावामुळे सुरक्षेविषयी निष्काळजीपणा वाढत आहे. इमारती
व सदनिका बांधताना एकलेपणाला महत्व देऊन सुरक्षिता अडगळीत टाकली जात आहे. आर्थिक
बाजूला महत्व देणे आवश्यक झाल्यामुळेही सुरक्षितेला दुय्यम स्थान मिळत आहे.
शासनाला हा खर्च कमी करणे शक्य आहे. सर्वसाधारणपणे भारतामध्ये जागेची किंमत भरमसाठ
आहे व ती सर्वसाधारण व्यक्ती पेलू शकत नाही. शासनाने सुरक्षितते करिता हा खर्च कमी
करावा. त्याकरिता बांधकाम व्यवसायिकानी सदनिका बांधताना त्यांची रचना जुन्या
चाऴी/वाड्याप्रमाणे करावी. शासनाने चटईक्षेत्र निर्देशांकात सूट द्यावी म्हणजेच
शासनाने मंजूर केलेल्या पद्धतीने केलेले जादा बांधकाम इमारतीचा चटईक्षेत्र
निर्देशांक ठरवताना लक्षात घेऊ नये. ही सवलत अशा प्रकारच्या उपयोगासाठी जर कमी उत्पन्न
गटातील नागरिकाना इतर बाबतीतही देता येईल. नाही तरी शासन अनधिकृत बांधकामे अधिकृत
करण्यासाठी ही सवलत देतच आहे. हे जादा बांधकाम जिन्याच्या व सदनिकेत प्रवेश
करण्याकरिता लागणाऱ्या विशिष्ठ बांधकामाकरिता उपयोगी पडेल व त्या मुळे सदनिका
जास्त सुरक्षित होतील. त्यांचा एकलेपणा सुरक्षित ठेवला जाईल. हे ही त्यातून साध्य
होईल. या करिता सदनिकांची आखणी करताना चित्रात दाखविल्याप्रमाणे इमारतीची आखणी
करावी. थोडक्यात चौरसाच्या (किंवा जवळ जवळ चौरसा सारख्या चौकोनाच्या) परिघावर
सदनिका व त्या चौकोनाच्या मध्यावर जिना बांधावा.