Tweet

Tuesday 16 January 2018

Safety of Residential Flat (Development)

To read in English please scroll down
हिंदी में पढ़ने के लिये नीचे स्क्रोल किजिये।
मराठीत येथे वाचा.

         भारतामध्ये वैयक्तिक एकलेपणा पेक्षा सुरक्षेला जास्त महत्व दिले जाते. परंतु, पाश्च्यात्य प्रभावामुळे सुरक्षेविषयी निष्काळजीपणा वाढत आहे. इमारती व सदनिका बांधताना एकलेपणाला महत्व देऊन सुरक्षिता अडगळीत टाकली जात आहे. आर्थिक बाजूला महत्व देणे आवश्यक झाल्यामुळेही सुरक्षितेला दुय्यम स्थान मिळत आहे. शासनाला हा खर्च कमी करणे शक्य आहे. सर्वसाधारणपणे भारतामध्ये जागेची किंमत भरमसाठ आहे व ती सर्वसाधारण व्यक्ती पेलू शकत नाही. शासनाने सुरक्षितते करिता हा खर्च कमी करावा. त्याकरिता बांधकाम व्यवसायिकानी सदनिका बांधताना त्यांची रचना जुन्या चाऴी/वाड्याप्रमाणे करावी. शासनाने चटईक्षेत्र निर्देशांकात सूट द्यावी म्हणजेच शासनाने मंजूर केलेल्या पद्धतीने केलेले जादा बांधकाम इमारतीचा चटईक्षेत्र निर्देशांक ठरवताना लक्षात घेऊ नये. ही सवलत अशा प्रकारच्या उपयोगासाठी जर कमी उत्पन्न गटातील नागरिकाना इतर बाबतीतही देता येईल. नाही तरी शासन अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी ही सवलत देतच आहे. हे जादा बांधकाम जिन्याच्या व सदनिकेत प्रवेश करण्याकरिता लागणाऱ्या विशिष्ठ बांधकामाकरिता उपयोगी पडेल व त्या मुळे सदनिका जास्त सुरक्षित होतील. त्यांचा एकलेपणा सुरक्षित ठेवला जाईल. हे ही त्यातून साध्य होईल. या करिता सदनिकांची आखणी करताना चित्रात दाखविल्याप्रमाणे इमारतीची आखणी करावी. थोडक्यात चौरसाच्या (किंवा जवळ जवळ चौरसा सारख्या चौकोनाच्या) परिघावर सदनिका व त्या चौकोनाच्या मध्यावर जिना बांधावा.
      सदनिकामध्ये प्रवेश सार्वजनिक कॅारिडॅारमधून असावा. हे सार्वजनिक कॅारिडॅार प्रत्येक मजल्यावर सदनिके समोर बांधावेत व त्यांना जिन्याशी जोडणारे सार्वजनिक कॅारिडॅार असावेत. या प्रकारे रहिवाशाकडे येणाजाणारे सदनिके मध्ये तसेच कॅारिडॅारमधून इतर येणाजाणाऱ्यांना सुद्धा दिसतील. त्यामुळे चोरी-मारामारीच्या घटनावर चांगले नियंत्रण बसेल. म्हणजेच सुरक्षा वाढेल. हा चटईक्षेत्र निर्देशांकातून जागा वगळण्याचा नियम खालील उपयोगा करिताही वापरावा.
 1.          झोपडपट्टीत राहणाऱ्या व दारिद्ररेषेखालील व्यक्तीना छोटी सदनिका

 2.          वृद्धाश्रम. काही सदनिका असा असाव्यात की त्यामध्ये शयनकक्ष पूर्णपणे नित्य गरजा भागविणारा असावेत. स्वयंपाकघर तसेच बैठकीची खोली सर्वांना गरजेनुसार वापरता येण्यासारखी असावी. म्हणजे एकाध दुसऱ्या पाहुण्याकरिता किंवा घरातील माणसाकरिता शयनकक्ष बैठकीची खोली वापरता येण्यासारखी असावी व पाहुणे आले तर सगळ्यांकरिता बनविलेली खोली वापरावी. वृद्धाश्रम २-३-४ शयनकक्ष अथवा मोठा गरजेनुसार असावा. येथे त्या इमारतीत राहणाऱ्या कुटुंबासी संबंधित वृद्धाना प्राथमिकता द्यावी.
 3.          प्राथमिक आरोग्य केन्द्र (तपासणी व प्राथमिक उपचार)
 4.          किरकोळ औषधिलविक्री दुकान
 5.          घरगुती उपकरणे (रोजच्या वापरातील घरात वापरली जाणारी उदाहरणार्थ रेफ्रिजेटर, मिक्सर वगैरे) देखभाल तसेच दुरुस्ती दुकान.
 6.          नेहमी लागणाऱ्या किरकोळ वस्तू दुकान.
 7.          भाजीपाला विक्री दुकान. वगैरे

No comments:

Popular Posts