|
Fort in Swarajya |
|
Shree Chhatrapati Shivaji Maharaj |
छत्रपति श्री शिवाती महाराज आग्र्याहून परत आल्यावर तहामध्ये मोगलाना दिलेले
किल्ले परत घेण्याची तयारी करत होते परंतु त्या मध्ये यश येत नव्हते. एकदा अशाच एका
अयशस्वी मोहिमेनंतर दुपारच्यावेळी भूक लागल्यावर एका शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये आले.
झोपडीतील माईने भात-आमटी शिजवून वाढली. महाराजानी ताटाच्या मध्यावर खाण्याकरिता हात
घातला परंतु पोळल्यामुळे मागे घेतला. ती माय हसली व म्हणाली राजे कडेने खाल्ले तर बरे
होईल. हात भाजणार नाही. महाराजाना किल्ले परत घेण्याची मोहिम अयशस्वी होण्याचे कारण
लक्षात आले. किल्ल्यांच्या आजुबाजुचा मुलुख काबीज केल्यावरच किल्ला सर करता येईल हे
समजले. त्यानी तेच केले व भराभर एका पाठोमाग एक करत थोड्याच दिवसांत किल्ले परत स्वराज्यात
सामील करून घेतले.