Minorities exercising Voting Right |
Queue at Polling Booth |
Propaganda Rally |
Propaganda Rally |
प्रत्येक पक्षाने पक्षातर्फे उमेदवारांची
निवड करण्याकरिता इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांचे किस्से ऐकून खात्री पटते की
हे सर्व उमेदवार निवडून नाही आले तरी जनतेला लुबाडणार. एक महिला उमेदवाराने सांगितले
की निवडून आल्यावर नोकरी सोडणार व जनसेवेतून चरितार्थ भागविणार. दुसरीने सांगितले की
जरी लग्न झाले तरी येथून जाणार नाही. नवऱ्याला येथे बोलावून घेणार. सर्वसाधारणपणे असे
समजले जाते की, महिला राजकारणात आल्या तर भ्रष्टाचार बंद होईल. परंतु, यावरून असे दिसते
की, महिला पुरुषांपेक्षा कोठल्याही बाबतीत कमी नाहीत, अगदी भ्रष्टाचार करण्यात सुद्धा.
मुलाखतीला जाताना उमेदवार 20-30 मोठ्या अलिशान गाड्या घेऊन आपापल्या मतदारसंघात प्रथम
स्वतःची मिरवणूक काढतात. पैसे देऊन कार्यकर्ते म्हणून रोजंदारीवर मजूर जमा करतात. हे
पाहून पक्षही त्यांना तिकीट देतो. टिकीट देताना उमेदवार किती खर्च करू शकतो हे प्रथम
पाहिले जाते. असे म्हणतात की सध्या महापालिकेच्या निवडणुकीकरिता 60 लाख ते 1 कोटी रुपये
खर्च करू शकणाऱ्या उमेदवाराचे तिकीट निश्चित होते. याचा अर्थ जनतेने समजून घेतला पाहिजे.
पैसा खर्चा, निवडून या व नंतर काय धुमाकूळ घालावयाचा असेल तो घाला असा स्पष्ट संदेश
पक्षां कडून उमेदवारांना दिला जात आहे. उमेदवारही स्वतःच्या शेकडो पिढ्यांकरिता पैसा
मिळवितात आणि त्यातील क्षुल्लक हिस्सा पक्षांना देतात. याकरिता जनतेला मृत्युच्या दाढेत
ढकलण्यासही मागे पुढे पाहत नाहित. पिंरीचिंचवडमध्ये बीआरटीच्या नांवाखाली बसथाब्याच्या
रुपात केवळ उजव्या बाजूने प्रवेश असलेल्या बस वापरता याव्यात म्हणून मृत्यूचे सापळे
उभा केले जात आहेत.
उमेदवार छोट्या छोट्या भेट वस्तूही
देत आहेत. गेल्या 5 वर्षांत कधीही न दिसलेले उमेदवार रोज कोणाला ना कोणाला संक्रांतीच्या
शुभेच्छा व तिळगूळ देऊन मतदारांना साकडे घालत आहेत. हे सर्व केवळ जनतेची सेवा करण्याकरिता
नाही हे आपणा सर्वांना माहित आहे. तरी आपण त्यांना निवडून देतो व त्यांना व्याजासहितच
काय मुद्दलाच्या कित्येक पटीने पैसा परत मिळविण्याची संधी देतो. अशा उमेदवारांना मत
देणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखेच आहे. मतदारांनी ठरवले पाहिजे
की, जो उमेदवार जास्त पैसा खर्च करतो त्याला अजिबात मत द्यावयाचे नाही. जो उमेदवार
जनसेवा करतो त्यालाच मत द्यावयाचे. असा जनतेने निश्चय केला पाहिजे.
अशा परिस्थितीत काही उपाय नाही
काय? माझ्या मते आहे. नक्कीच आहे. त्याकरिता काही बदल आवश्यक आहेत. मी ते याच ब्लॉगवर
सुचविले आहेत एक निवेदन पंतप्रधानांना पाठवित आहे. सर्व जनतेने जर हा मुद्दा लावून
धरला तर भ्रष्टाचाराच्या प्रश्नाला योग्य उपाय मिळेल. भ्रष्टाचार पूर्ण रित्या संपला
नाही तरी त्याला चाप बसेल. पुढच्या वेळेला खरोखरच जनसेवा करणारे उमेदवारच निवडणुकीत
उतरतील. त्याकरिता खलील कड्या पहा.
http://www.change.org/petitions/save-democracy
http://janahitwadi.blogspot.com/2012/01/blog-post.html
http://janahitwadi.blogspot.com/2011/12/blog-post_31.html
http://janahitwadi.blogspot.com/2012/01/blog-post.html
http://janahitwadi.blogspot.com/2011/12/blog-post_31.html
No comments:
Post a Comment