Tweet

Sunday, 5 August 2012

No One can Choose Parents:

SuryaPutra Karna
Maharshi Vyas
दैवः यत्ते कुले जन्मः। मद हत्ते तु पौरुषम्। कित्येक नाटक सिनेमातील हमखास वाक्य. ऐकल्यावर पेक्षक टाळ्या वाजवतात व त्या नंतर दुसऱ्या एखाद्या वाक्याची टाळ्या वाजविण्याकरिता प्रतिक्षा करतात. जास्तीत जास्त बाहेर पडताना चर्चा होते. काय अभिनय केलाय त्या नटानं! जसं काही स्वतः कर्णच स्टेजवर (किंवा पडद्यावर) उतरलाय! पुढची प्रगति म्हणजे अमक्या तमक्याला (किंवा  अमक्या तमकीला) घरी गेल्या बरोबर फोन (दूरध्वनि) करुन सांगतोच (किंवा सांगतेच). हे नाटक (किवा हा सिनेमा) एकदा तरी बघच. मी पुन्हा पाहणार आहे. केवळ या वाक्यासाठी. काय जीव तोडून काम केलेय. वगैरे. गुरु द्रोणाचार्यानी एकलव्यावर केलेल्या जुलमाचा शक्यतो मनातल्या मनात निषेध करावयाचा. महर्षि व्यासानी काय उत्तम प्रकारे कर्णाचे चारित्र्य रेखाटलेय. जसं (जसे) काही स्वतः कर्णच बोलतोय! या पलिकडे मात्र आपली गाडी कधी जात नाही.

कुंति व सूर्य मीलन
Mahaveer Karna
महर्षि व्यासानी कर्णाला कुंतिपुत्र दाखविला. त्याकरिता कुंतिला कुमारी माता बनविले. पितृत्त्व सुर्याला दिले. जन्म कुंतिच्या कर्णातुन करविला. हे सर्व कशासाठी? कर्णाला सूतपुत्र दाखविला असता तर काय बिघडले असते. परंतु नाही. सूतपुत्र एवढा शूर कसा दाखविता येईल? अर्जुनाला तुल्यबळ किंवा वरचढ कसा खपवून घेता येईल? पण त्या मध्ये एक चूक राहिली. कर्णाचे नांव कर्ण म्हणून का ठेवले तर त्याचा जन्म कर्णातून झाला. हे अधिरथाला व राधामातेला कसे कळले याचा खुलासा नाही. समजा राधामातेला ते माहित असते तर तिने कर्णाला लगेच राजवाड्यात पोहचवले असते. राजघराण्यांतील मूल ठेवण्याची तिची हिम्मतच झाली नसती. महर्षि व्यासानी कर्णाला परत राजवाड्यात नेले नाही. त्यांना त्यामुळे होणारा अनर्थ रेखाटण्याचे टाळावयाचे होते. भगवान श्रीकृष्णानी कर्णाला "........ त्यावेळी कोठे गेला होता तुझा धर्म" असे म्हणून निरुत्तर केले असे महर्षि व्यास सांगतात. त्याचवेळी मातृघर्म, पितृधर्म वगैरे धर्म सांगतात. त्या वेळी त्यांना मित्रधर्म कसा सुचला नाही? एकंदरीत महर्षि व्यासांनाही समाजाची अनिष्ठ बंधने तोडता आली नाहीत. कोठलीही गोष्ट मग ती खरी असो वा काल्पनिक, ती समाजमुख नसेल तर कोणीही ती स्वीकारणार नाही. त्या मुळे त्यामध्ये त्रृटी राहणारच.
यावरुन मला दोन गोष्टी आठवल्या. एक कॉलेजमध्ये (महाविद्यालयांत) शिकणारा नीच समजल्या जाणाऱ्या जातीतील मुलगा गांवी जातो. तो घरी संस्कृत वाचताना एक पुजारी महाशय ऐकतात. लगेच त्यांचा "अब्राह्मण्यम्" चा जप चालू होतो. त्याच्या वडिलाना सांगतात तुझा पुत्र संस्कृत वाचत आहे. संस्कृत लिहण्या-वाचण्याची परवानगी फक्त देव व ब्राह्मणांनाच आहे. असेच वाचत राहिला तर तो लवकरच मरेल. बिचारा बाप. पुत्र मरणाचा धोका कसा पत्करू शकेल? नशिबाने त्या मुलाच्या मित्राने मनात वाचण्याचा सल्ला दिला व त्याचे संस्कृचे अध्ययन चालू राहिले (या मध्ये दिलासा देणारी एक गोष्ट म्हणजे एका पुजाऱ्याने आडकाठी आणली तर दुसऱ्या पुजाऱ्याने अध्ययन चालू ठेवण्यात मदत केली). अशीच एक दुसरी गोष्ट. एक असाच हुषार विद्यार्थी. मराठी पाचवी पास होईपर्यंत त्याचा पहिला अथवा दुसरा नंबर (क्रमांक) येई. सहावीच्या तिमाही परिक्षेत त्याला 80 टक्के गुण गणितात मिळाले. इतर सर्वांना 70 टक्क्यापेक्षा कमी गुण मिळाले. नियमाप्रमाणे वर्गशिक्षक प्रत्येक विषयात पहिला आलेल्यांचे अभिनंदन करत होते. गणित विषय आल्यावर अभिनंदन सोडा त्यांनी वर्गातील सर्व मुलांना प्रश्न विचारला. "अरे मुर्खांनो चांभार तुमच्यापेक्षा जास्त गुण (मार्क) मिळवितो. तुम्हाला लाज वाटत नाही?" त्या मुलाने अभ्यास करणे कमी केले. व्यायामावर जास्त जोर दिला. दर वर्षी उत्तीर्ण होत राहिला परंतु त्याचे गुण 50 टक्क्यावर गेले नाहित. आई-वडिल मुलगा उत्तीर्ण होतो यावरच खूष होते. शेवटी 10 वीच्या नऊमाही परिक्षेत अनुत्तीर्ण झाला. रीतसर शाळेतर्फे पालकांना पत्र पाठविले गेले. योगायोगाने ते पत्र त्या मुलाच्या हातात पडले. त्याने ते लपवून ठेवले. त्याच बरोबर अभ्यासाची तयारी सुरू केली. त्याचा योग्य परिणाम झाला. 10 वीच्या अंतिम परिक्षेत शाळेमध्ये त्याचा दहावा क्रमांक आला. 11 वीच्या शाळेच्या परिक्षांमध्ये त्याचा पहिला क्रमांक सतत येत राहिला. त्याचा एक ब्राह्मण वर्गमित्र होता. दोघांच्या चुरस होती पण ती मैत्रीच्या आड कधीही आली नाही. दोघांच्या घरची परिस्थिति सारखीच व बेताचीच होती. एका धनिकाने 11 वीच्या बोर्डाच्या परिक्षेला शाळेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याकरिता 500 रुपयांचे बक्षिस ठेवले होते. पहिल्याने विचार केला जर मित्र पहिला आला तर त्याला हे बक्षिस मिळेल व महाविद्यालयिन शिक्षण शक्य होईल. त्याला स्वतःला शिष्यवृत्ती मिळणारच होती. पुरेशी नसली तर कसे बसे त्याचे शिक्षण पुढे चालू राहू शकते. त्याने ठरविले की बोर्डाच्या परिक्षेत मित्राला प्रथम येऊ द्यावयाचे. त्याकरिता त्याने उपाय शोधला कि काही सोपे प्रश्न सोडवायचे नाहित. त्याकरिता भूमितीचे एक प्रमेय न सोडविण्याचे ठरविले. योगा योगाने निकालामध्ये त्याचा मित्र पहिला आला व त्याला 5 गुण जास्त मिळाले. त्याने जर ते प्रमेय सोडविले असते तर त्याला 1 गुण जास्त मिळाला असता त्यामुळे त्याच्या मित्राला 500 रुपये मिळाले नसते.
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद सांगतअसत की धर्म दोन भागात असतो. पहिला भाग वेदान्त व दुसरा स्मृती. वेदान्तांतील तत्त्वज्ञान विश्वव्यापी तसेच निरंतर आहे. स्मृती म्हणजे समाजामध्ये बंधुभाव राहावा, भांडणे होऊ नयेत म्हणून बनविलेले नियम. हे नियम शाश्वत नसतात. स्थान, वेळ, समाज या वर निर्भर असतात. त्यामध्ये बदल झाल्यास ते बदलावेच लागतात. समाजातील निस्वार्थी तसेच विद्वान व्यक्ती हे काम करताच. म्हणूनच 12 मनुनी आपआपले नियम बनविले. पुढे कित्येक ज्ञानी, निस्वार्थी तसेच समाजाची चिंता करणारानी नियमात बदल केला. भारतात महावीर, बुद्ध असे महात्मे झाले. भारताबाहेरही, पैगंबर, येशु असे महात्मे झाले. सर्वांनी वेदान्त प्रमाण मानला व आपापल्या लोकांच्याकरिता स्मृती बनविल्या. आपण सर्व मात्र स्मृतीलाच धर्म मानू लागलो. धर्माचे पहिले कर्तव्य म्हणजे बंधुभाव स्थापन करणे हेच विसरलो. जगामध्ये फक्त एकच धर्म आहे व तो विश्वव्यापी तसेच चिरंतन आहे. असे असतानाही भारतामध्ये जातिव्यवस्थेचे निर्मूलन ना झाले ना होण्याची आशा आहे. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारताच्या राज्यघटनेचे श्रेय डॉ. बाबसाहेबाना देण्यातही आपण आढेवेढे घेतो. असे का?
याचे उत्तर कोणाकडे आहे? कोणी खुलासा केला तर मी त्यांचा आभारी राहिन. ही "इति" नाही "अथ" आहे.

1 comment:

Umesh said...

जब अभिमन्यु की मौत युद्ध में हुई तो कितना बवाल मचा। मगर जब घटोत्कच को मृत्यु के खाई में ढकेल दिया तो किस को दुख हुआ मालूम नही।

Popular Posts