Tweet

Sunday, 3 April 2016

Catch Them Young: BharatMata Ki Jay



भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपति डॉ. एपीजे अब्दुलकलाम यांच्याकडे सत्ता असताना सुद्धा त्यांनी प्रौढाऐवजी लहान मुलांनाच शिकविणे पसंत केले. यामागे त्यांना असणारी खात्री. मुले कोठलीही गोष्ट समजाऊन घेतात व ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. ही मुले ज्ञानी लोकांचा आदर करतात व त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. सध्या प्रकर्षाने जाणवणाऱ्या दोन गोष्टी आहेत. पहिली भारत माता की जय।व दुसरी स्त्रियां व पुरुष एक समानया दोन्ही बाबतीत आपण समाजाला नवीन गोष्टी स्वीकारण्यास वेळ देत नाही असे माझे मत आहे. डॉ. कलाम असते तर त्यांनी या देन्ही गोष्टी शाळेतल्या मुलांना सांगितल्या असत्या. त्या सांगताना मुलांना समजणाऱ्या भाषेत व सर्व कारणासह सांगितल्या असत्या. भारतमाता की जय।याबद्दल सांगताना त्यांनी धर्मस्थापनेपासून सुरवात केली असती.
शत्रूपासून संरक्षणाकरिता शक्ति पाहिजे. प्रत्येकजण आपली शक्ति वाढवू शकतो. परंतु, त्यावर मर्यादा असते. जर दुसरा जोडीदार असेल तर शक्ति दुप्पट होऊ शकते, जसे जोडीदार वाढत जातील तशी टोळी बनते व शक्ति वाढत जाते. टोळीत जितके सभासद जास्त तेवढी शक्ति जास्त. म्हणजेच टोळी बनविली तर शक्तिच्या वाढीला मर्यादा नसते. हे सूत्र पकडून मानवच काय पशू पक्षी सुद्धा टोळ्या करून राहू लागले व राहतात. मानवाने या टोळीला प्रथम नांव दिले समाज व हल्ली राष्ट्र. या समाजाकडे शक्ति असते परंतु, तो समाज जर एकसंघ राहिला तरच! समाज एकसंघ राखण्याकरिता एक तत्व पकडून नियम बनविले. ते तत्व म्हणजे महर्षि व्यासांच्या शब्दात परोपकाराय पुण्याय।व जगद्गुरु संत तुकारामांच्या भाषेत एकमेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ। हा विचार किंवा तत्व पृथ्वीच्या पाठीवर सगळीकडे तंतोतंत तेच. हे तत्वज्ञान सोपे वाटत असेल तरी व्यवहारात उतरवण्याकरिता खूप भ्रम निर्माण होऊ शकतात. समजा कोणी दुसऱ्याला मारण्याकरिता पाठलाग करत असेल व तो दुसरा दृष्टीक्षेपाच्या बाहेर गेला तर रस्त्यात कोणाला तरी त्याच्याबद्दल विचारणे आवश्यक आहे. ते कोणीतरी तुम्ही असलात तर नक्कीच कोणाला मदत करावयाची याबद्दल भ्रम निर्माण होईल. म्हणूनच अशा स्थितीत कसे वागावे याचे नियम पाहिजेत. ते प्रत्येकाला अवगत पाहिजेतच. त्यामध्ये सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे ते पाळले जाण्याची खात्री पाहिजे. सध्याच्या युगात आपण राज्यघटना बनवितो व त्या अनुषंगाने कायदेही बनवितो. हेच काम समाजातील निस्वार्थी, ज्ञानी व्यक्तीनी ज्यांना समाजाबद्दल पूर्ण माहिती आहे अशानी जगामध्ये निरनिराळ्या ठिकाणी निरनिरळ्या वेळी केले. जगात त्यांना कोणी महर्षि म्हणतो तर कोणी, देवपुत्र तर कोणी देवाचा दूत तर कोणी आणखी काही. या सर्वानी नियम बनविले ते त्या समयी त्यांना माहित असलेल्या विशिष्ठ स्थळी वास्तव करत असलेल्या समाजाकरिता. नैसर्गिकरित्या जरी तत्वज्ञान एकच असले तरी नियम वेगवेगळे झाले. त्यालाच आज आपण वेगवेगळे धर्म मानतो. नियमांमध्ये फरक पडण्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणची, त्या काळातील समाजाची स्थिती. जगाच्या पाठीवर यामध्ये म्हणजे, स्थळ, काळ, समाज यामध्ये समानता नसल्यामुले एकच नियम लागू करणे शक्य झाले नाही. भारतामध्ये राष्ट्र या संकल्पनेला मोठे महत्व प्राप्त झाले. कारण शक्ति टिकण्याकरिता राष्ट्रातील प्रत्येकाने गुण्यागोविंदाने राहणे आवश्यकच. हे राष्ट्रातील एकमेकांना समजणार कसे. त्या करता भारत माता की जय। ही घोषणा कामी येते. इस्लामच्या स्थापनेच्या वेळी मूर्तीपूजा परमसीमेला पोहचली होती. लोक मूर्तीलाच देव मानू लागले होते. देव हा निराकार, निर्गुण असतो हे विसरले होते. त्यामुळे पैगंबर साहेबाना मूर्तीपूजा बंद करणे श्रेयस्कर वाटले व ते त्यांनी केले. घरामध्ये आपण फक्त सर्वात ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ व्यक्तिलाच मान देतो असे कधी होत नाही. आजोबाबरोबर आजी, वडिल, आई, मोठी भावंडे यानाही मान देतो. याचा अर्थ फक्त देवापुढे मस्तक टेकवणे हे याचे कारण त्या काळी, त्या स्थानातील समाजात पसरलेले मूर्तीपूजेचे वेड किंवा अतिपणा हेच काऱण आहे. फक्त देवापुढेच नतमस्तक होणे ही झाली अंधश्रद्धाव प्रत्येकाचा मान राखणे ही झाली श्रद्धाडॉक्टरानी हे मुलाबरोबर इतरानाही सांगितले असते पण त्यांचा विश्वास मुलांवर होता. आपणही हेच केले तर हा प्रश्न चुटकीसरसा सुटणार नाही, फळे मिळण्यास वेळ लागेल हे मान्य आहे. परंतु, कसलेही नुकसान न होता काही वर्षांनी तो अडथळा राहणारच नाही. पुढची पिढी आनंदाने भारतमाता की जय।म्हणेल. असेच स्त्री-पुरुष समानतेबाबत म्हणता येईल.

No comments:

Popular Posts