10 डिसेंबर 2011
Open Letter to Hon. Annaji |
भारतीय जनता भ्रष्टाचाराला
कंटाळली आहे. परंतु, त्याच बरोबर वैयक्तिकरित्या कोणीही भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यास
तयार नाही. सामान्य माणसाला भ्रष्टाचार नकोसा आहे. परंतु हा सामान्य माणूस जेंव्हा
खुर्चीवर बसतो तेंव्हा कसलीही लाज न बाळगता समोरच्या माणासाकडून पैसे मागतो. तो समोरचा
माणूससुद्धा हेलपाट्यांना लागणारा खर्च जास्त आहे हे जाणून पैसे देण्यास तयार होतो.
आर्य चाणक्य रात्री शासनाचे काम करत होते. त्यवेळी एक गांजलेला मनुष्य त्यांना भेटण्यास
आला. चाणक्यांचा त्याला पहिला प्रश्न होता कि, बाबारे तुझे काम वैयक्तिक का शासनाचे?
त्यांने काम वैयक्तिक आहे असे म्हटल्यावर चाणक्यांनी दुसरी समई पेटविली व पहिली विझवली.
कारण काय तर पहिल्या समईत शासनाचे तेल होते. भारतात हाताच्या बोटावर मोजण्याइतके तरी
लोक आहेत का जे वैयक्तिक पातळीवर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यास तयार आहेत? आर्य चाणक्यांचा
कित्ता गिरविण्यास तयार आहेत? जो तो दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शत्रूचा नाश
करण्याचा प्रयत्न करत आहे. समाजकार्यांकरिता भ्रष्टाचारी मार्गाने पैसे मिळविले त्याचे
समर्थन करतात. याला आपली टीमही अपवाद नाही.
आपण ज्यांना जनतेचे
सेवक समजतो ते 15 टक्के मते मिळवून निवडणूक जिंकतात व स्वतःला जनतेचे प्रतिनिधी म्हणवून
घेतात. त्या बळावर जनतेचे भले करणारे फक्त तेच आहेत असा दावा करतात. याला कारण एकच.
जनता मतदान करण्याकरिता उमेदवाराकडून निवडणुकीच्या वेळच्या स्वतःच्या वैयक्तिक मागण्या
मान्य करून घेते किंवा सुट्टी समजून पर्यटनाला जाते. मतदान साधारणपणे 50 टक्के किंवा
कमीच होते. निवडणुकील 10-20 उमेदवार उभे असतात. जो कोणी जास्तीत जास्त मते मिळवितो
तो निवडून आला असे समजले जाते. याकरिता 10-15 टक्के मते पुरेशी होतात. त्याचा अर्थ
जो उमेदवार एक गठ्ठा मते मिळवू शकतो तो विजयी होतो. उमेदवार त्याकरिता समाजाचे स्वतःच्या
सोईनुसार धर्माच्या, जातीच्या किंवा दुसऱ्या कोठल्याही मार्गाने विभाजन करतो व निवडून
येण्याचा डाव रचतो. यामुळे समाजामध्ये धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण करत आहे याचे
त्याला सोईरसुतक नसते.
उमेदवाराच्या निवडणुक
खर्चावर मर्यादा आहे. समजा त्या मर्यादेत एखाद्या उमेदवाराने खर्च केला (खरा खर्च शेकडो
पटीने जास्त असतो) तरी तो त्याला कसा परवडतो हे मोठे गूढ आहे. त्याला जो पगार मिळतो
त्यातून तो खर्च वसूल होत नाही हे शेंबडे मूलही सागू शकते. याचा अर्थ खर्च भ्रष्टाचारी
मार्गानेच वसूल होणार हे जनतेनेच मान्य केले आहे. प्रत्येक उमेदवाराला वाटते जरी पक्षाने
तिकीट नाही दिले तरी निवडणूक लढवायचीच. यातून पक्षांतराला प्रोत्साहन मिळते. चपराशाच्या
नोकरीकरिता सुद्धा शिक्षण व अनुभव लागतो. परंतु, निवडणुक लढवण्याकरिता पात्रता म्हणजे
भारताचे नागरिकत्त्व व वय एवढाच निकष आहे. निवडणूक लढवणारा प्रत्येक उमेदवार मी समाजसेवेसाठी
रिंगणात उतरत आहे असेच भासवितो. जर समाजसेवा करावयाची आहे तर त्याला निदान समाजसेवेच्या
अनुभवाबद्दल तरी विचारले पाहिजे.
भ्रष्टाचार मिटविण्याचा
सर्वोत्तम मार्ग म्हणजे भ्रष्टाचाराच्या निरनिराऴ्या संधींचा नाश करणे. बँकेतर्फे सर्व
व्यवहार झाल्यास ते तपासणे सोपे आहे. भ्रष्टाचाराच्या संधीच कोणाही व्यक्तीला मिळणार
नाहीत. मोठी रक्कम व्यवहारात लागणार नाही. हे प्रत्यक्षात आणण्याकरिता खूप तयारी लागेल.
वेळ लागेल. परंतु हे एकदा केले की कित्येक वर्षे भ्रष्टाचाराबद्दल कसलाही लढा देण्याची
आवश्यकताच भासणार नाही. चोरांना पकडून शिक्षा करण्या पेक्षा चोरीच होऊ नये याची खबरदारी
घेणे श्रेष्ठ असे माझे मत आहे. या सर्व गोष्टी विस्ताराने येथे मांडल्या आहेत.
मी एक निवेदन डॉ मनमोहनसिंह, पंतप्रधान, भारतवर्ष याना देण्याकरिता बनविले आहे. माहिती येथे पाहण्यास मिळेल.
तसेच निवेदन (हिदी व इंग्रजी मध्ये) येथेपाहता येईल.
धन्यवाद.
1 comment:
Reserve Bank of India has issued directives to all scheduled commercial bank to make available Zero balance account named as Basic Bank Account to every one. The account shall have facility for Debit cum ATM card at no extra charges. Therefore every eligible person can have a bank account in near future. This is the first step towards eradication of corruption in public life. I had suggested this in my article @ http://janahitwadi.blogspot.in/2011/01/new-bank-accounts.html
Now there is a need the citizens press their demand for other bank accounts. Social workers and leaders can take up this issue and succeed.
Post a Comment