Safety of School Going
Children:
शाळेत जाणाऱ्या मुलांची सुरक्षाः
School Children |
School Bus |
Bus Stop on RoadSide |
1.62 Lakh Accidents per Annum |
हल्ली मुलांना वय वर्षे ५ झाले की बालवाडी किंवा तत्सम शाळातून प्राथमिक शाळेत प्रवेश दिला जातो. त्याचा अर्थ जर सर्वसाधारण परिस्थितीचा विचार केला तर सिनिअर महाविद्यालयातील पहिल्या वर्षाचा विद्यार्थीही अज्ञान (म्हणजे वय वर्षे १८ पूर्ण न केलेला) असू शकतो. याचा अर्थ शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील स्वयंचलित दुचाकी चालवणारे जवळ जवळ १००% विद्यार्थी स्वयंचलित वाहने चालविण्यास सक्षम नाहित. या मुलांच्या स्वतःच्या तसेच रस्त्यावरील नागरिकांच्या सुरक्षेकरिता स्वयंचलित दुचाकी चालवणारे धोकादायक आहेत. शासनाने ही धोकादायक परंपरा खंडित केलीच पाहिजे. त्याकरिता आर्थिक दंड आकारण्याऐवजी त्या विद्यार्थ्यांना पोलिस चौकीच्या चकरा मारण्यास लावावे. असे केले तरच विद्यार्थ्य़ांना शिस्त लागेल. आर्थिक दंडाचा परिणाम सर्वश्रृत आहे. जितका दंड जास्त तितकी गुन्ह्यातून सुटका करुन घेण्याची फी जास्त. त्यामुळे ही पळवाट वापरण्याची शक्यता जास्त.
Accident in USA |
No comments:
Post a Comment