|
National Integration |
राखीव जागा बाबत भारताच्या निरनिराळ्या भागातून समाजाच्या पुढारलेल्या जनते कडून रोज समाजाच्या नवनविन गटाकरिता ऱाखीव जागांच्या मागण्या येत आहेत व त्या थांबण्याची लक्षणे दिसत नाहित. याचा अर्थ भारतीय समाजाचे विघटन चालू आहे व ते थांबण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यानीही या वादात उडी घेतली आहे. त्यांच्या मते राखीव जागा आर्थिक निकषावर द्याव्यात. लगेच शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी ही मागणी जेंव्हा त्यांच्या वडिलांनी केली तेंव्हाच का मान्य केली नाही असा प्रश्न उभा केला आहे. परंतु, या वादात राखीव जागांची आवश्यकता व त्या कोणत्या तत्वावर आधारित आहेत याचाच सर्वांना विसर पडत आहे.