महाराष्ट्रदेशा। दुष्काळाच्या
देशा।
कविवर्यानी महाराष्ट्रदेशाची
स्तुती केली आहे. त्यामध्ये एक ओळ जोडता येईल. "दुष्काळाच्या देशा।" सर्वसाधारणपणे
आपणापैकी सर्वसाधारणपणे असे काही तरी म्हणून अगतिकता जाहिर करतात. "दुष्काळ तर
पाचवीलाच पुजला आहे.", "पाणीच नाही तर देणार कोठून.", "दगडांमध्ये
पाणी मुरणार कसे?", "टँकर तरी किती पुरवणार?" वगैरे. हे चित्र बदण्याकरिता
दुर्दम्य इच्छाशक्ति, मनगटात जोर, निस्वर्थीपणा व विकासाची मानसिकता प्रथम राजकिय पुढाऱ्यांमध्ये
निर्माण झाली पाहिजे. ती आपोआप जनतेत झिरपेल. असे झाले तरच महाराष्ट्रदेश सुजलाम सुफलाम
होईल.