Tweet

Wednesday 3 October 2012

Necessity to learn Marathi


ज्ञानभाषा

मराठी शिकण्याची आवश्यकता.
आंतर राष्ट्रीय तसेंच ज्ञान भाषा म्हणून इंग्रजीचे महत्त्व वाढत आहे. मराठी शाळेत पहिली पासून इंग्रजी शिकवण्यास सुरवात झाली आहे. उत्तर भारतीयांचे लोंढे फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या सर्वच शहरात येत आहेत. अशा परिfस्थतीत मराठी भाषा टिकेल काय? माझ्या मते आपणाला मराठीचा अभिमान असेल तर मराठी अवश्य टिकू शकते. इंग्रजी सर्व जगाने स्वीकारली तरी. अगदी महाराष्ट्रात उत्तर भारतीयांची सख्या दहापट झाली तरी. त्या करता इतिहासात डोकाऊन पाहण्याची व त्या पासून शिकून पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

आजचे जग
जगामध्ये इंग्रजी जाणणाऱ्या लोंकाची संख्या हिंदीच्या खालोखाल आहे, इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. इंग्रजी वर प्रभुत्त्व असणाऱ्या लोकांचे विश्व मोठे आहे. इंग्रजी वर प्रभुत्त्व असणाऱ्या लोकांना जागतिक स्तरावर रोजगार धंद्याची संधी खूपच आहे. इंग्रजी वर प्रभुत्त्व असणाऱ्या लोकांना अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, मध्य पूर्व, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया तसेंच कांही आफ्रिकी देशामध्ये मान मिळतो. हे आणि असेच कांही मुद्दे वादातीत आहेत. परंतु, म्हणून भारतातील प्रत्येक व्यक्तीने इंग्रजीवर प्रभुत्त्व मिळवले पाहिजे हे हास्यास्पद आहे.
चीन मध्ये काम-धंदा
भारतातील प्रत्येक व्यक्तीला परदेशात काम धंद्याला जाण्याची गरज नाही. भारतातील प्रत्येक व्यक्तीला फक्त इंग्रजीतच उपलब्ध असलेल्या ज्ञानाची आवश्यकता नाही. सघ्याच्या संगणक युगामध्ये, ज्या गोष्टीचे ज्ञान मराठी मध्ये सध्या नाही परंतु, बऱ्याच लोकाना ते आवश्यक आहे, असे ज्ञान मराठी मध्ये उपलब्ध करून देणे सहज शक्य झाले आहे. तेंव्हा फक्त निवडक लोकाना इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, परंतु सर्वाकरता गरजेचे नाही. या तत्त्वाचा स्वीकार करणे वादातीत असावे. या वर एक अक्षेप जरूर घेतला जाईल. मग हिंदी इंग्रजीचे काय? हिंदी इंग्रजी कडे दुर्लक्ष केले तर राष्ट्रीय व जागतिक चढाओढीत आपण मागे पडू. या करता व्यवहारातील 2 उदाहरणे घेऊ. 
ड्रायव्हर व मेकॅनिक
वाहन चालक व न्यायालय. वाहनचालक होण्याकरता अभियांत्रिकीची पदवी असण्याची अजिबात आवश्यकता नाही. वाहन निर्माण करण्याकरता किंवा दुरुस्तीकरता अभियांत्रिकेचे ज्ञान आवश्यक आहे. न्यायालयात प्रत्त्येक पक्षकाराला कायद्याचे सखोल ज्ञान असण्याची गरज नाही. कांही थोड्या व्यक्तिना सखोल ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून सर्वानी अभियांत्रिकी, कायदा वगैरे सर्वच्या सर्व ज्ञान आत्त्मसात करण्याची अजिबात गरज नाही. म्हणून ज्या व्यक्तिना गरज आहे त्यानीच हिंदी इंग्रजी चे सखोल ज्ञान संपादन करावे. इतराना जुजबी ज्ञान पुरेसे.
सध्या महाराष्ट्रात राहणारे व स्वतःला महाराष्ट्रीयन समजणारे सर्व केंव्हापासून महाराष्ट्रात राहतात? श्री छत्रपति शिवाजी महाराजांचे पूर्वज राजस्थानातून आले. कित्येक व्यापारी गुजराथ, राजस्थान, कर्नाटकातून आले. पूर्व मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवारांचे पूर्वज आंध्रातून आले. थोडक्यात महाराष्ट्रात आजच नाही तर पूर्वीपासून बाहेरून लोंढे येत आहेत. या मध्ये नाविन्य नाही. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया वगैरे देशात सुद्धा असे लोंढे वाहतात. मग महाराष्ट्रात आले तर काय बिघडले? परंतु, महाराष्ट्रात नक्कीच बिघडते. कारण, इतर सर्व स्थलांतरीत जेंथे जातात तेथील भाषा आधीच शिकून जातात. त्या मुळे स्थानिक लोकाना त्याना सामावून घेण्यास कमी कष्ट पडतात. महाराष्ट्रात येणाऱ्या लोंढ्यामध्ये हाच फरक आहे. जुन्या काळी आलेल्या लोकानी मराठी भाषा शिकून त्यातूनच व्यवहार केले. त्यांच्या नंतरच्या पिढ्या उत्तम मराठी समजू बोलू लागल्या आणि ते येथीलच झाले. मराठी टिकण्याकरता स्थलांतरिताना मराठीत व्यवहार करणे भाग पाडले पाहिजे.
बंगालीत व्यवहार करा.
या करता कोलकत्त्याचे उदाहरण बोलके आहे. जे कांही तेथे दिसते ते बंगालीतूनच. जे ऐकू येते ते बंगालीतूनच त्या मुळे तेथे जो जाईल त्याला बंगाली आलीच पाहिजे. बंगाली येत नसेल तर दैनंदिन व्यवहार करण्यास कष्टच कष्ट. तीच परिस्थिती चेन्नईत व कांही वर्षानी दिल्लीत. हिंदी सिनेमा पंजाबी होत चाललाय. जी भाषा स्वरहीन वाटत असे त्याच भाषेतील गाणी आजची पिढी गुणगुणत असते. यातून धडा घ्यावा
येथे येणाऱ्या स्थलांतरीतामध्ये 'परक्या ठिकाणी आलो' ही भावना निर्माण होऊ देणे म्हणजे मराठी आत्मसात करण्यापासून त्याना परावृत्त करण्या सारखे आहे. मराठी शिकणे सोपे आहे हे त्यांचे वर बिंबवले पाहिजे. मराठी शिकण्यास प्रवृत्त केले पाहिजे. वेळ काढून त्याना मोफत शिकवले पाहिजे. त्यातून एकाच फलाची आशा धरावी की मराठी वापरणाराची संख्या एकाने वाढली. असे एक एक करून जोडत गेलो तर येथे अमराठी कोणीच राहणार नाही व मराठी भाषेला तारण कर्ता शोधण्याची जरूरी भसणार नाही. गरज आहे आपण सर्वानी सतत सर्व व्यवहार मराठीतून करण्याची. शासनाने सर्व कामकाज मराठीतून करण्याची.
खरोखरच मराठी भाषा आपण नेहमीच वापरली पाहिजे. इंग्रजी किंवा हिंदी कमीतकमी वापरावी. माझी आई इतरांच्या आई पेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे व असणारच. माझी आई मला चांगल्या प्रकारे व अचूक समजून घेते. तसेच मला स्वतःला समजणे सुलभ होते. म्हणून माझी मातृभाषा मला प्रिय आहे. मराठी भाषेचा वापर वाढवावा. या मध्ये प्रत्त्येक मराठी माणूस व शासन दोघांचाही सहभाग आवश्यक आहे. शासनाने रामदास स्वामी प्रमाणे 'असा भूमंडळी कोण आहे जो मराठीयेच्या सेवका वक्र दृष्टी पाहे.' ही भूमिका घेतली पाहिजे व प्रत्त्येकाने मराठीचा वापर सर्वच व्यवहारात केला पाहिजे.
शाळे मध्ये 3 किंवा 4 वर्षे हिंदी इंग्रजी चे शिक्षण पर्याप्त आहे.या योगे आपला शिक्षणावरचा खर्च कमी होऊ शकतो, आपली अस्मिता जपू शकतो, आपले संस्कार नविन पिढीला देऊ शकतो आणि यातून जगामध्ये आपली ओळख निर्माण करू शकतो. हे निवडक लोक किती असावेत याचा आडाखा बनवणे अवघड नाही. माझ्या अंदाजाने हा आकडा 10 टक्क्यापेक्षा कमी असावा. तेंव्हा निरनिराळ्या स्तरातील 10 ते 20 टक्के व्यक्तीना इंग्रजीत प्राविण्य मिळवण्यास प्रोत्साहन द्यावे व बाकीना मराठी मध्ये प्राविण्य मिळवण्यास मदत करावी.
याच बरोबर मराठी सोपी करण्याकरता पावले उचलली पाहिजेत. देवनागरीलिपी मध्ये स्वर लिहण्याकरता दुप्पट चिन्हे वापरली जातात. प्रत्येक स्वराला स्वर म्हणून एक चिन्ह व व्यंजनाला जोडताना एक. दोन्ही ठिकाणी एकच चिन्ह वापरले तर 16 चिन्हे कमी होतील. व्यंजनाला जोडताना वापरात असलेले चिन्ह दोन्ही ठिकाणी वापरावे. फरक एवढाच की ते स्वतंत्रपणे लिहले की तो स्वर व व्यंजनाला जोडून लिहले की ते व्यंजनाचा वेगळा उच्चार, असे समजावे. या मुळे टंकलेखनाकरता वापरल्या जाणाऱ्या किल्ल्या कमी लागतील. दुसरा बदल नामा/क्रिया याना प्रत्यय जोडताना त्यांचे रुप बदलू नये. उदाहरणार्थ 'करण्याकरता' असे लिहण्या ऐवजी 'करणे करता' असे लिहावे. असे लिहल्यामुळे शब्द संख्या कमी होईल व 'स्पेल चेकींग' सोपे होईल. आणखीही बदल करुन मराठी भाषा सोपी व संगणकावर वापरण्याकरता सुलभ करता येईल.
50 वर्षांनंतरसुद्धा मराठीभाषा प्रचलित असेल ती ज्ञानभाषा होईल. ती तशी  व्हावी म्हणून सोपी करावी, संगणकमुखी करावी. हे केले तर कसलाही प्रश्न पडणार नाही.
तेंव्हा सर्व मराठी भाषकानी एकमुखाने म्हणू या "मराठी भाषेचा विजय असो."

No comments:

Popular Posts