 |
महाराष्ट्रराज्य |
वेगळा
विदर्भ का
नको?
वेगळे विदर्भ राज्य बनवावे अशी अनेकांची इच्छा आहे. त्याला विरोध करणारेही कमी नाहीत. देशातील किंबहुना जगात सर्वात जास्त सुशिक्षित आमदार विदर्भातीलच. त्यांचे कडे निरनिराळ्या डझनावारी पदव्या आहेत. त्यांनी हा प्रश्न खोलात जाऊन तपासला. संशोधनांती त्यांना असे सापडले की, वेगळा विदर्भ स्वबळावर उभा राहू शकत नाही. म्हणजेच तो केन्द्रशासनाचा मिंधा राहील. ज्यांना वेगळा विदर्भ पाहिजे त्यांचा भर मुख्यतः दोन गोष्टीवर आहे. पहिली गोष्ट पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी विदर्भातील जिल्ह्यात विकास कामे करत नाहीत. विदर्भातील जिल्ह्यांना सापत्नभावाने वागवतात. दुसरी गोष्ट जितके राज्य लहान तितके प्रशासनाला सोपे. हे युक्तीवाद नव्याने समजून विचार करून विदर्भातील जिल्ह्यांतील नागरिकानी निर्णय घेतला पाहिजे.