Tweet

Sunday, 10 July 2011

विकास कोणता व कसा?

मनुष्याचा विकास दोन प्रकारचा आहे. पहिला अध्यात्मिक व दुसरा आर्थिक. आपण म्हणतो अर्थाशिवाय विकास नाही. अर्थ या शब्दाचा उपयोग योग्य, उपयुक्तता असाही होतो व पैसा असाही होतो. या वाक्यात दोन्हीही उपयोग बरोबर आहेत. विकास उपयुक्त असावा. नाही तर त्याला विकास म्हणता येणार नाही. तसेच भौक्तिक विकासाकरिता पैसा आवश्यक आहे. भारतामध्ये व विशेषतः महाराष्ट्रात साधुसंतांनी अध्यात्मिक विकासाकरिता खूप प्रयत्न केले. त्यांना यशही आले. पंढरीची वारी त्याची आजही साक्षीदार आहे. परंतु, ढोंगी साधु व पुजाऱ्यांनी त्यांच्या प्रयत्नावर पाणी फिरविले. मनुष्यांना देवाला लाच देण्यास त्यांनी शिकविले. इथे नमस्कार कर व जे मागशील ते मिळेल फक्त त्याकरिता आम्हाला दक्षिणा दे. असा विश्वास जनतेत निर्माण केला. अशा साधुनी जनतेला अब्जावधि रुपयानी गंडवले. ते मेले तेंव्हा त्यातील किती पैसे त्यांनी सोबत नेले हा एक वेगळा विचार आहे. पैशाचा दुरुपयोग राजकारण्यानी केला व करत आहेत. स्वतः राजकारणींच कबूल करतात की जनतेने दिलेल्या करांचा उपयोग 10-15 टक्केही जनतेच्या हिताकरिता होत नाही. प्रत्येक राजकारणी निवडुन येण्याकरिता कोट्यावधि रुपये खर्च करतो. मला नाही वाटत की हा खर्च जनतेच्या प्रेमापायी होतो. हे सत्पुरुष! निवडुन आल्यावर जो पगार मिळतो त्यातून वसूल करू शकणार नाहीत हे स्पष्ट आहे. मग प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा कि निवडणुक खर्च कसा वसूल केला जातो? त्या उत्तरात हे स्पष्ट होईल की जनतेने दिलेल्या करांचा उपयोग जनतेकरिता 10-15 टक्केच का होतो? जर भौतिक विकासावर 10-15 टक्केच खर्च होत असतील तर विकास काय डोंबलाचा होणार?
एकच आशेचा किरण भौतिक विकासाबाबत दिसत आहे. जनतेला सत्तेतील लोकांनी केलेला पैशाचा दुरुपयोग पसंत नाही. जनतेमध्ये याबद्दल क्षोभ उत्पन्न झाला आहे. त्यांना समजावून सांगण्याचे काम अण्णा हजारे व रामदेव बाबा सारखे सध्याचे महापुरुष करत आहेत. दोघांनी स्वतंत्रपणे दोन बाबीवर जोर लावला आहे. ते आपापल्या मुद्यावर ठाम आहेत. ते पूर्ण यशस्वी व्हावेत अशी सर्वाप्रमाणे माझीही इच्छा आहे. परंतु, जरी ते यशस्वी झाले तरी दानवांवर त्याचा फारसा प्रभाव पडणार नाही. त्याचा परिणाम दानवांच्या रस्त्यावर काटे पेरण्यासारखा होईल. दानवांची बुद्धी देवापेक्षा प्रभावी असल्याने ते सहज त्यावर मात करतील. इतके कायदे असतानाही सार्वजनिक पैशाचा अपव्यय होत आहे व होत राहणार. दानव पैशामध्ये भागिदार मिळवतील, विलंब निर्माण करतील, जनतेचे लक्ष इतरत्र वळवतील, नाना क्लुप्त्या लढवतील व जनतेने दिलेल्या करातून 10-15 टक्क्याऐवजी 5-10 टक्के विकासावर खर्च होतील. जवळजवळ 100 टक्के खर्च होण्याकरिता संपूर्ण अभ्यासाची आवश्यकता आहे.
जनतेने स्वतःमध्ये बदल घडवून आणणे हे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने जवळचा रस्ता शोधण्याऐवजी राजमार्गानेच जाण्याच दृढ निश्चय केला पाहिजे व आचरणात आणला पाहिजे. विचार करा संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या सारख्या कोणी संताने नवस करण्यास सांगितले काय? नवसाचे पैसे शेवटी कोणाला मिळतात. देव सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वकालीन आहे असे आपण मानतो. असा देव तुमच्याकडून पैशाची अपेक्षा करेल काय? त्याकरिता जो पैसा तुम्ही देता त्याचा प्रथम व खरा मालक कोण? देवाला तुमचे स्वतःचे देणे अपेक्षित असताना देवाच्या पैशाची देवाला लालूच का दाखवता? त्यामुळे देव नवसर्कत्यावर प्रसन्न होईल काय? प्रत्येकाने ठाम विश्वास ठेवला पाहिजे की मी जे देवाला अर्पण करीन ते माझे स्वतःचे असले पाहिजे. हा संतांचा उपदेश मनी बिंबवला तरच दानवांना दोष देण्याची जनतेची पात्रता निर्माण होईल.
अशा जनतेने दानवांचा सर्वनाश करण्याकरिता दानव कोणत्या मार्गाने पैशाचा अपव्यय करतात यावर संशोधन करून त्या त्या कारणावर उपाय शोधून तसे कायदे करण्यास दानवांना भाग पाडले पाहिजे. उदाहरणार्थ चलनी नोटा मोठ्या किंमतीच्या असल्याने पैशाची देवाण घेवाण करण्यास व साठवून ठेवण्यात सुलभता आहे. मग या नोटा चलनातून काढून टाकाव्यात. परंतु, हे करताना इतर काय त्रुटी निर्माण होतात त्यावरही संशोधन झाले पाहिजे. त्यातून उपाय सुचतील. जसे पैशाचा व्यवहार बँकेतूनच करणे. त्यतील त्रुटीतून पुढे येईल. प्रत्येकाला सध्या अस्तित्वात असलेली कमीत कमी पैशाची अट पाळणे शक्य नाही. उपाय सुचेल शून्य शिल्लक खाते निर्माण करणे. याप्रकारे प्रत्येक कारणावर पूर्ण संशोधनांती उपाय शोधून ते प्रत्यक्षात आणणे हाच एक भरवंशाचा मार्ग निदान मला तरी दिसतो.

1 comment:

sscguides said...

Evidently the chief distinction between online education and attending an actual university is that it is not essential to be in any particular place to study. This means that much of the community facet of going to college is removed from the online education experience. Depending on your observation, this could in fact be a very good thing. It makes it possible to avoid a lot of anxiety that many college cultures have become inundated with.

Popular Posts