Tweet

Wednesday, 26 August 2009

रस्त्यावरील अपघातांची अनेक कारणे आहेत.

सर्व कारणांची मीमांसा करुन त्यवर उपाय योजावे लागतील. मला समजलेली कारणे खाली देत आहे. त्या मध्ये सर्वांनी भर घालण्याचे आवाहन करतो.
1. रस्त्याचे आर्किटेक्चर.
2. रस्त्याची बांधणी.
3. वाहन चालक.
4. पादचारी.
5. रहदारीचे नियमन.
6. न्यायालये.
7. इंन्शुरन्स
रस्त्याचे आर्किटेक्चर महत्त्वाचे आहे.
रहदारी नियंत्रणाकरिता रस्त्याचे आर्किटेक्चर महत्त्वाचे आहे. रस्ता बांधताना अगर नंतर त्याला रहदारी नियंत्रणाकरिता सुयोग्यबनविण्याकरिता रस्त्याचा सर्व बाजूनी विचार करुन त्याची आखणी केली पाहिजे. या मध्ये खालील मुद्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे.
1. रस्त्यावरील रहदारी म्हणजे पादचारी, सायकलस्वार, स्वयंचलित दुचाकी, घोड्यांचा टांगा, बैलगाडी, तीनचाकी, चारचाकी वाहने, अवजड वाहने, रस्त्यावरील फेरीवाले तसेच विक्रेते, वाहनतळ वगैरे.
2. रस्त्याचे निरनिराळ्या वापरकत्यांर्नुसार विभाजन.
3. प्रत्येक विभागाची आखणी.
4. वापरर्कत्यांनी नियम पाळावेत या करिता व्यवस्था.
5. सुरक्षितता.
6. पर्यावरण.
रस्त्यावर पहिला हक्क पादचाऱ्यांचा आहे. हे ध्यानांत घेऊन रस्त्याच्या आखणीत पादचाऱ्यांच्या गरजांना प्राथमिकता देणेआवश्यकच काय अनिवार्य आहे. पादचाऱ्याना कोठलाही अडथळाविना चालता यावे, रस्ता सुरक्षितपणे ओलांडता यावा, थकवाआल्यावर विश्रांती घेता यावी, नैसर्गिक विधी करता याव्यात यावर पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. प्रदूषण टाळण्यासाठी सायकलीनांउत्तेजन दिलेच पाहिजे. सायकलस्वारांकरिता वेगळी व्यवस्था त्याकरिता अनिवार्य आहे. ज्या ठिकाणी बैल किंवा घोड्यांनी ओढलीजाणारी वाहने वापरांत असतील तेथे त्या करिताही वेगळी व्यवस्था लागेल. स्वयंचलित वाहनांची फक्त रस्यावर चालण्याकरिताचनाही तर ती उभी करण्याची व्यवस्था नजरेआड करता येणार नाही. ही वाहने वळविण्याकरिता विशिष्ठ जागा लागते. त्यांचा प्रकाशसमोरील वाहनाना त्रासदायक होतो. त्यातून अपघाताची शक्यता वाढते. ही गरज नजरेआड करू नये. रस्त्यावरील फेरीवाल्यांसंबंधीबहुतेक सर्वच नाराज आहेत. त्यांच्या बद्दल अभद्र बोलतात. परंतु हेच लोक त्यांच्याकडून वस्तू विगकत घेतात. म्हणजे हे विक्रेतेसर्वाना सामान विकत घेण्यासमयी पाहिजेत परंतु, त्यानंतर ते नकोत. ही गोष्ट अशक्य आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांचे अस्तित्त्वस्वीकारलेच पाहिजे. त्याचीही सोय रस्त्यावर केलीच पाहिजे. रस्त्याकडेला इमारतीना परवानगी देताना तेथे येणाऱ्या वाहनांचाविचार केला जात नाही. थोडाबहुत विचार तेथे राहणाऱ्या तसेच काम करणाऱ्यांचा होतो. परंतु कामांकरिता येणाऱ्यांचा विचारअजिबात होत नाही. वाहनतळाकरिता जागेचा शोध रहदारील अडथळे यावयास लागल्यावर होतो. पालिका स्वतः खर्च करूनवाहनतळ उभारते व लोकांकडून पैसा वसूल करते. ही जबाबदारी तसे पाहिले तर इमारतींच्या मालकांची आहे.
रस्त्यावर पहिला हक्क पादचाऱ्यांचा आहे. हे ध्यानांत घेऊन रस्त्याच्या आखणीत पादचाऱ्यांच्या गरजांना प्राथमिकता देणेआवश्यकच काय अनिवार्य आहे. पादचाऱ्याना कोठलाही अडथळाविना चालता यावे, रस्ता सुरक्षितपणे ओलांडता यावा, थकवाआल्यावर विश्रांती घेता यावी, नैसर्गिक विधी करता याव्यात यावर पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. प्रदूषण टाळण्यासाठी सायकलीनांउत्तेजन दिलेच पाहिजे. सायकलस्वारांकरिता वेगळी व्यवस्था त्याकरिता अनिवार्य आहे. ज्या ठिकाणी बैल किंवा घोड्यांनी ओढलीजाणारी वाहने वापरांत असतील तेथे त्या करिताही वेगळी व्यवस्था लागेल. स्वयंचलित वाहनांची फक्त रस्यावर चालण्याकरिताचनाही तर ती उभी करण्याची व्यवस्था नजरेआड करता येणार नाही. ही वाहने वळविण्याकरिता विशिष्ठ जागा लागते. त्यांचा प्रकाशसमोरील वाहनाना त्रासदायक होतो. त्यातून अपघाताची शक्यता वाढते. ही गरज नजरेआड करू नये. रस्त्यावरील फेरीवाल्यांसंबंधीबहुतेक सर्वच नाराज आहेत. त्यांच्या बद्दल अभद्र बोलतात. परंतु हेच लोक त्यांच्याकडून वस्तू विगकत घेतात. म्हणजे हे विक्रेतेसर्वाना सामान विकत घेण्यासमयी पाहिजेत परंतु, त्यानंतर ते नकोत. ही गोष्ट अशक्य आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांचे अस्तित्त्वस्वीकारलेच पाहिजे. त्याचीही सोय रस्त्यावर केलीच पाहिजे. रस्त्याकडेला इमारतीना परवानगी देताना तेथे येणाऱ्या वाहनांचाविचार केला जात नाही. थोडाबहुत विचार तेथे राहणाऱ्या तसेच काम करणाऱ्यांचा होतो. परंतु कामांकरिता येणाऱ्यांचा विचारअजिबात होत नाही. वाहनतळाकरिता जागेचा शोध रहदारील अडथळे यावयास लागल्यावर होतो. पालिका स्वतः खर्च करूनवाहनतळ उभारते व लोकांकडून पैसा वसूल करते. ही जबाबदारी तसे पाहिले तर इमारतींच्या मालकांची आहे. त्याना का सूट दिलीजाते हे एक गूढ आहे. इमारतीला परवागी देताना वाहने उभी करण्याची व्यवस्था इमारतींच्या मालकानी केलीच पाहिजे.
रस्त्याचे वापरकर्ते बेशिस्त आहेत असा अक्षेप घेऊन रहदारी नियंत्रणास जबाबदार असणारे जबाबदारी झटकतात. परंतु, त्याना शिस्तलावणे ही जबाबदारी त्यांचीच आहे हे ते विसरतात. रस्त्याची आखणी सुयोग्य पद्धतीने केल्यास नियम तोडणे अशक्य करता आलेनाही तर निदान अवघड करता येणे शक्य आहे. हे ते विसरतात. उदाहरणार्थ पादचाऱ्यांनी वाहनांच्या लेनमध्ये कडमडू नये म्हणूनयोग्य पादचारीपथ बांधला, त्याना रस्ता ओलांडण्याकरिता सोपा मार्ग आखला तर पादचारी वाहनांच्या जागेत येऊन रहदारीलाअडथळा आणणार नाहीत. रस्ता ओलांडण्याकरिता 6-7 मिटर उंच पूल असेल तर त्याचा उपयोग कित्येक पादचाऱ्यांना करता येणारनाही व जे करू शकतात ते आळस करु शकतात. त्या ऐवजी 2 मिटर खोल भुयारी मार्ग बांधून वाहने 4-5 मिटर उंचावरून नेली तरनक्कीच पादचारी त्याचा उपयोग करतील. या करिता खर्च जास्त येतो म्हणून हे नाकारले जात असेल तर रस्ता न बाधून सर्व खर्चवाचविता येईल! चौकामध्यें जेंव्हा वाहन येते तेंव्हा त्या वाहनाचा वेग कमी झालाच पाहिजे. त्या करिता वेग नियंत्रक वापरात आहेत. परंतु त्यांचा उपयोग होत नाही. वेग नियंत्रकांवर वाहने वेग थोडा कमी करतात व लगेच वाढवतात. चौकांत वेग नियंत्रक वेगळ्यापद्धतीचे असावेत की जेणे करून वाहनांना वेग जवळ जवळ शून्य करावा लागेल. वाहनाना उलट्या दिशेने जाण्याकरिता जे मार्गआखले जातात त्या करिता वाहनाना 1-2 किलोमिटर पुढे जाऊन परत यावे लागते. त्याचा परिणाम म्हणजे एकमार्गी रस्त्यांवरदुतर्फा वाहतुक चालू होते. रस्त्याची आखणी करताना हा मुद्दा विसरू नये. सुरक्षित वाहतुकीकरिता शिस्त महत्त्वाची आहे व रस्त्यांचीयोग्य आखणी करुन शिस्त लावण्यास मदत होते हे सत्य आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यास रस्त्याची आखणी मदत करते.
पर्यावरण सुरक्षितेकरिता रस्त्याकडेने झाडे लावतात. हे योग्य आहे. परंतु रस्त्यांची रुंदी वाढवताना ही झाडे बळी पडतात व नंतर त्याकरिता काहीच केले जात नाही. रस्त्याची आखणी करताना हा मुद्दा लक्षात घेतल्यास झाडांची कत्तल थांबवता येईल. उदाहरणार्थरस्ता दुभाजक 20-25 मिटर रुंद ठेवले तर दुभाजकाची रुंदी कमी करून रस्ता रुंद करता येईल. रस्त्यावर वाहने सतत धूर ओकतअसतात. हा धूर नैसर्गिकरित्या वर जातो. परंतु, बाजूच्या इमारतींमुळे तो त्वरित लांब जात नाही. या करिता एक तर मिारतींची उंचीकमी असावी अथवा ठिकठिकाणी इमारतीं मध्ये अंतर असावे. अंतर इतके असावे की, नैसर्गिक वारा धूर लांब घेऊन जाईल.
रस्त्याच्या अवयवांचे आर्किटेक्चर.
रस्त्याचे निरनिराळे अवयव खालील प्रमाणे1. रस्त्याच्या लेन2. रस्ता दुभाजक3. वेग नियंत्रक4. चौक5. पावसाळी पाणी वाहूननेणारी गटारे6. पर्यावरणपूरक झाडे7. वहातूक नियंत्रकरस्त्याच्या लेन हा सर्वात महत्त्वाचा घटक. रहदारीसाठी याचा पूर्णपणे सततउपयोग होतो. याची आखणी नेटकेपणाने केली पाहिजे. कमीतकमी वळणे, समतल पृष्ठभाग, पूर्ण नियोजित आडवी लेन वनिरनिराळ्या वाहनांसाठी नियोजित लेन. शहरांतील गांवांतील रस्ते शक्यतो एका रेषेत असावेत. महामार्गला मधून मधून वळणेआवश्यक असतात. ते शहरांतील रस्त्यांकरिता अपेक्षित नाही. रस्त्यांचा पृष्ठभाग समतल परंतु, मध्याकडून गटारांकडे उतारअसणारा असावा. त्या मध्ये खड्डे अथवा पाणी साचून राहील अशा खोलगट जागा नसाव्या. रस्ता योग्य प्रमाणात गुळगुळीतअसावा. रस्त्यावर आकस्मात वेग कमी करण्याची वेळ येऊ नये. वेग नियंत्रक असे असावेत की प्रथम इशारा देतील व इशारा मिळूनहीवेग कमी न केल्यास मोठा हादरा देतील. चौकाजवळील वेगनियंत्रक वाहनाचा आंस तोडणारा असला तर चांगलेच आहे. त्याच बरोबरवेग नियंत्रित केल्यास कसलेही नुकसान न करणारा असावा. रस्त्याची रुंदी भविष्यात वाढवण्याची आवश्यकता पडू शकते. त्याचाहीविचार करुन नियोजन करावे.
रस्ता दुभाजकाचे खूप उपयोग आहेत.
सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे समोरासमोरून येणाऱ्या वाहनांची टक्कर टाळणे. दुभाजकाची रुंदी वाढवून समोरून येणाऱ्यावाहनांच्या हेडलाईटचा त्रासही जवळ जवळ टाळू शकतो. वाहनांना परत फिरावयाचे असेल तर वाहन वळवून विरुद्ध दिशेने येणाऱ्यावाहनावर लक्ष देऊन स्वतःच्या वाहनाला यू टर्न देता येतो. दुभाजकाची रुंदी कमी असेल तर अशाप्रकारे वाट पाहणारे वाहन रहदारीलाअडथळा आणतेच तसेच अपघाताला निमंत्रण देते. दुभाजकांवर कमी उंचीची झाडे, हिरवळीचे गवत, फुलझाडे वगैरे लाऊन नुसतेसुशोभिकरणच नाही तर पर्यावरणाला पूरक व्यवस्था करता येते. भविष्यात रस्ता अपुरा पडू शकतो. त्याकरिता नियोजन रस्तादुभाजकाची रुंदी वाढवून करता येते. कमी रहदारीच्या रस्त्यावरही प्रशस्त रस्तादुभाजक सोंदर्यांत भर टाकतातच तसे भविष्यांतउपयोगी सिद्ध होतात.
वेगनियंत्रक
वेगनियंत्रणासाठी नियंत्रकाची अर्धगोल रचना सर्वात जास्त सोयीची आहे. निरनिराळ्या व्यासाचे हे नियंत्रक हलक्याशा धक्यापासूनकणा मोडणाऱ्या धक्यापर्यंत काम करतात. सर्वसाधारणपणे चौकामध्ये येताना वेग कमी कमी कमी करत येण्याने अपघात टळतात. या करिता चौकापासून 50-100 मिटरवर कमी व्यासाचा नियंत्रक असावा. हा नियंत्रक वाहनचालकाला चौक जवळ आहे. वेग कमीकरा अशी सूचना देईल. त्या नंतर 20-25 मिटरवर जरा मोठ्या व्यासाचा नियंत्रक असावा. हा नियंत्रक वेग कमी असेल तरवाहनचालकांना धन्यवाद देणारा असावा. जर जास्त असेल तर कडक इशारा देणारा असावा. चौकातील झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडेमिटरवर सर्वात मोठ्या व्यासाचा नियंत्रक असावा. हा नियंत्रक वेग जवळ जवळ शून्य असेल तर धन्यवाद देणारा असावा. परंतु, जितका वेग जास्त तितके वाहनाचे जास्त नुकसान करणारा असावा.
5-7
चौक हे अपघाताचे सर्वात प्रिय ठिकाण.
जास्तीत जास्त प्राणघातक अपघात येथेच होतात. येथे आर्किटेक्टची खरी परिक्षा होते. चौकात ट्रॅफिक आयलँड असते व ते असावयासहवे. परंतु, ते कित्येक ठिकाणी वाहनांना वळवण्याकरिता जागा असावी म्हणून छोटे केले जाते. ते मोठे असणे फायद्याचे आहे. दुसरीमहत्त्वाची अडचण म्हणजे चौकांत येणारी वाहने शिस्त पाळत नाहीत. ज्याना उजवीकडे वळायचे असते ती डाव्या बाजूला येऊनथांबतात. ज्याना डावीकडे वळावयाचे आहे त्याना विनाकारण थांबावे लागते व चौकांतील गर्दी कारण नसताना वाढते. या करिताचौकाच्या अगोदरच वाहनांना त्यांना ज्या दिशेने जावयाचे असेल त्या प्रमाणे लेन असल्या पाहिजेत. कोठलेही वाहन एखाद्या विशिष्ठलेन मध्ये आले तर त्याला फक्त ती लेन ज्या दिशेने वाहने जाण्यास बनवली आहे त्याच दिशेने जाता यावे. या करिता विशिष्ठ लेनचारस्ता इतर लेन पेक्षा 15-20 सेंमि खोल केला तर उपाय सापडतो. सर्व प्रकारची रहदारी लक्षात घेऊन चौकांची आखणी करावी.
सायकली, घोडागाडी वगैरे करिता लेन.
सायकली, घोडागाडी, बैलगाडी, सार्वजनिक वाहतुकीच्या बस, रुग्णवाहिका, ऑटोरिक्षा वगैरेकरिता विशिष्ठ आखणी केली पाहिजे. जेथे जेथे या प्रकारची वाहने रस्त्यावर येऊ शकतात तेथे तेथे हे गरजेचे आहे. काही वाहने तुरळक प्रमाणात असतील तर काही प्रकारएकत्र करुन त्यावर उपाय व्हावा. मात्र सायकली करिता वेगळा भाग आवश्य असावा. सायकलीला उत्तेजन देणे हे पर्यावरणपूरक वआरोग्यवर्धक आहे. सार्वजनिक वाहतुकींच्या बस व रुग्णवाहिकाकरिता वेगळी लेन असावी. या लेनमधुन इतरांना वापर करण्यास पूर्णमज्जाव असावा. प्रत्येक चौकांत ही लेन उड्डाणपुलांवरुन न्यावी. तसेच तिच्या दोन्ही बाजूस जाळीचे कॉम्पाऊंड असावे. त्यामुळे येथेदुसरी वाहने येऊच शकणार नाहीत. ही लेन सायकल व सर्वसाधारण लेन मध्ये असावी. उड्डाणपुलांच्याखली वाहने उभीकरण्याकरिता उपयोग करता येईल. वाहन तळाकरिता जागा शोधण्याची आवश्यकता भासणार नाही. सायकलींकरिता जी लेन असेलती रुंद केली तर ऑटोरिक्षांनाही तेथे सामाऊन घेता येईल. पादचारीपथ व सायकल लेन या मध्ये 2-3 मिटर मोकळी जागा असावी. याजागेत वृक्ष वेली व विक्रेते, ठेलेवाले-हातगाडीवाले यांची सोय करावी. त्या नंतर पादचारीपथ व पावसाळी गटारे असावीत. पादचारीपथांवर विश्रांतीसाठी बाकडे असावीत. ठिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यास विसरू नये. स्त्रियांकरिता वेगळी सोय करावी. सर्वचरस्त्यावर अशा वेग वेगळ्या लेनची आवश्यकता भासणार नाही. जेथे गरज नसेल तेथे एकापेक्षा जास्त प्रकाच्या वहातुकीकरिता एकलेन वापरावी.
वाहतूक नियंत्रक दिवे व पोलीस
वाहतूक नियंत्रक दिवे व पोलीस यांचा विचार आर्किटेक्टने केलाच पाहिजे. हे दिवे असे लावले पाहिजेत की, झेब्रा क्रॉसिंगच्यापुढे जरवाहनचालक गेला तर हे दिवे दिसू नयेत. हिरवा दिवा केंव्हा लागला हे समजू नये. त्यांची उंची अशी असावी की वाहनचालकालाआकाशाकडे पहाण्याची गरज नसावी. त्याचबरोबर उंच वाहनांना त्यांनी टक्कर देऊ नये. पोलीसांना उभा राहण्याकरिता अशी जागाअसावी की, तेथून त्याला पूर्णपणे वाहने दिसावीत परंतु, वाहनांच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची कमीत कमी झळ बसावी. मोठ्या चौकांतएकापेक्षा जास्त पोलिस असतील तर त्या सर्व पोलिसांना सुरक्षित ठिकाणी उभा राहून रहदारीला अडथळा न करता नियंत्रण करताआले पाहिजे. शिस्तभंग करण्याऱ्या वाहनांना अडवून बाजूला नेण्याची सोय असावी.
रस्ता बांधकाम
गुळगुळीत रस्ता म्हणजे उत्तम रस्ता असा सर्वसाधारण समज आहे. तो खराही आहे. परंतु हा रस्ता जेंव्हा बांधला तेंव्हा गुळगुळीतहोता नंतर त्यात खड्डे पडले ते दुरुस्त करू म्हणणे ही फसवणूक आहे. साधी गोष्ट अंगात बळ नसेल तर चेहऱ्यावर पावडर फासून तेजयेईल काय? स्नायु व हाडेही बळकट असतील तरच चेहऱ्यावर तेज दिसेल. रस्त्याचे स्नायु व हाडे बळकट असलीच पाहिजेत. ठेकेदाराला पैसे मिळवण्याकरता डांबरीकरणाची कामे सोपी, जनतेची दिशाभूल करणेही सोपे. नागरिकाना वाटते वा! 1 दिवसात रस्तादुरुस्त केला. ही शुद्ध फसवणुक आहे.
निसर्गातील कोठल्याही गोष्टीला 3 प्रमुख अंगे असतात.
बांधकामच काय परंतु, निसर्गातील कोठल्याही गोष्टीला 3 प्रमुख अंगे असतात. पाया, स्ट्रक्चर व संरक्षण कवच. रस्त्याचा पायाम्हणजे जेथे रस्ता बांधला जातो तेथील माती. ही माती अति महत्त्वाची. पाणी शोषून घेतल्यावर खूप प्रसरण पावत असेल तरनिरुपयोगी. निरनिराळ्या आकारमानाच्या खडीचे थर हे रस्त्याचे स्ट्रक्चर. हे जितके दाबून एकजीव होतील तेवढी त्याची ताकदजास्त. हे करताना भरपूर पाणी वापरले व रोलरने दाबले की ते जास्तीत जास्त एकजीव होते. खडी बरोबर वाळू (निदान मुरुम) पाहिजे, जेणे करुन खडी रोलर फिरवल्यावर एकजीव होईल. खडी मिश्रित डांबराचा थर हे रस्त्याचे संरक्षण कवच. हे दोन प्रकारे काम करते. वाहने वेगाने जाताना रस्त्याच्या स्ट्रक्चरला विखुरण्यापासून वाचवते. दुसरे पावसाच्या पाण्याला झिरपण्याला प्रतिरोध करते. वाहनांचे वजन तोलुन धरण्याची त्याची क्षमता खूपच कमी असते. रस्त्याच्या खालच्या थरामध्ये दोष असतील तर हे कवच तुटते, त्याला भेगा पडतात व त्यातुन पाणी खालच्या थरात जाते. पाण्यामुळे रस्ता कमकुवत होतो. हे आता थोडे विस्ताराने पाहू या.
रस्ता बांधण्याकरिता लागणारे मटेरिअल
दगड, माती, बिटुमन व पाणी यांची योग्य गुणवत्ता, प्रमाण व योग्य कार्यकौशल्य रस्त्याची दुर्दशा रोखू शकतात. मातीचा गुणधर्मआहे की, पाणी मिसळले की आकारमानात वाढ. निरनिराळ्या प्रकारच्या मातीच्या आकारमानातील वाढ वेगळी असते. सर्वसाधारणमाणसालााही हे प्रयोगा द्वारे पाहता येईल. चार पांच काचेचे ग्लास घ्या. त्या मध्ये वेगळी वेगळी माती वेगवेगळ्या ग्लास मध्येघाला. साधारणपणे अर्ध्या पेक्षा कमी असावी. काळी माती, बागेतली माती, रस्यावरील माती, न धुतलेली वाळू, धुतलेली वाळू, दगडाच्या क्रशरच्या परिसरातील दगडाची बारीक भुकटी वगैरे नमुने घ्यावेत. प्रत्येका करता वेगळा ग्लास मात्र आवश्यक. तसेचलाटण्याने कॉमपॅक्श्नही केले पाहिजे. प्रत्येक ग्लासवर माती कोठवर आहे तेथे खूण करा. नंतर सर्व ग्लास मध्ये बेतााने पाणी ओततरहा. मातीच्या वर 5-6 सेंटीमिटर पर्यंत पाणी आल्यावर तुरटीचा खडा पाण्यात फिरवा व तसेच 24 तास राहू द्या. 3-4 तासाने तुरटीचाखडा फिरवला तर चांगले. दुसऱ्या दिवशी प्रत्येक ग्लासातील मातीची लेव्हल पहा. मातीतील लेव्हलमधील वाढ वेगळी वेगळी दिसेल. पाणी शोषल्यावर मातीच्या आकारमानात बदल होतो तसेच निरनिराळ्या माती मध्ये तो वेगळा असतो.
रस्ता व पाणी
रस्ता व पाणीरस्ता बांधणीमध्ये दगड मातीच वापरतात. रस्त्यावर पाणी साठले की ते झिरपून खाली जाते व मातीत मिसळून तिचेआकारमान वाढवते. या मातीच्या प्रसरणाने रस्त्याला भेगा पडतात व आणखी पाणी मातीत शिरते. मातीचे पूर्णपणे तसेच खूप प्रसरणझाले तर रस्त्यात खड्डे पडतात. या पुढील रस्त्याची अधोगती भूमिती श्रेणीने होते. परंतु रस्ता तयार करताना पाणी शोषून घेणारीमाती वापरली तरच. तुमच्या प्रयोगात ज्या मातीचे प्रसरण जवळ जवळ शून्य अगर कमी झाले असेल ती माती रस्त्याच्या कामालायोग्य. रस्ता ज्या जमीनीवर बांधला जातो त्या मातीमध्ये सुद्धा हा गुणधर्म असलाच पाहिजे. नसेल तर ती माती बदलली पाहिजे. चांगल्या मातीमध्ये गवत अगर तत्सम पदार्थ असतील तर तेही असेच मारक ठरतात.
रस्ता तयार करताना घ्यावयाची काळजी
रस्ता तयार करताना योग्य प्रकारे रोडरोलर वापरला तर मातीची घनता वाढते. त्यामुळे पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते. वरूनवाहनाचा दबाव पडला तर माती विखरून जात नाही. योग्य प्रकारची माती, वाळू, मुरूम, दगडाची खडी वापरून, सर्व नैसर्गिकपणेकुजणारे (पाला, गवत, कागद वगैरे) पदार्थ काढून, भरपूर पाणी वापरून योग्य प्रमाणात काँमपॅक्शन केल्याने, व त्यावर योग्यतापमानाचे योग्य प्रमाणात खडी डांबर मिश्रण योग्य रीतीने काँपॅक्ट केल्याने उत्तम रस्ता तयार होतो. अशा रस्त्यावर खड्डे पडतनाहीत.
रस्तावापरर्कत्यांनी घ्यावयाची काळजी
रस्ता तयार करण्यात योग्य काळजी घेतली पाहिजे परंतु, रस्ता वापरताना सुद्धा तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी हारस्त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणूनच रस्त्यावर पावासा शिवाय इतर कोठलेही पाणी पडू देऊ नये. रस्ता धुण्याकरता शक्यतोकमीतकमी पाणी केंव्हा तरी वापरून तात्काळ रस्ता कोरडा करावा. रस्त्यावर चरी किंवा खड्डे खोदू नयेत. जेथे नाइलाज असेल तेथेताबडतोब बुजवून टाकावेत. बुजवताना योग्य श्रेणीची माती वापरावी. वाहने सावकाश चालवावीत जेणे करून एकदम ब्रेक लावण्याचीजरूरी भासू नये. अति वेगामुळे कंपने निर्माण होतात व त्यामुळे रस्त्याला चिरा जातात. या चिरातून पाणी खालच्या थरात जाते व त्याथरातील माती प्रसरण पावून रस्त्याला खड्डे पडतात. त्या मध्ये पाणी साठून खड्डे मोठे होतात. वाहने एकदम ब्रेक लाऊनथांबवल्यामुळे चाकाच्या घर्षणामुळे टायर तर झिजतेच परंतु रस्त्यावरील डांबराचा थर निघून जातो. म्हणजे पाण्याला खालच्याथरात जाण्याला वाट मोकळी मिळते.थोडक्यात रस्त्यात खड्डे पडण्याला बांधणारे व वापरणारे, दोघेही सारखेच जबाबादार आहेत. चुका हेतुपुरस्पर किंवा अज्ञानातून झाल्या म्हणून निसर्ग माफ करत नाही. मोठ्या माणसाने जाणून बुजून ज्योतीवर हात धरला कायकिंवा लहान मुलाने अज्ञानापोटी हात धरला काय दोन्ही परिस्थितीत हात हा भाजणारच.
रस्ता बनवणे व टिकवणे कसे साध्य होईल
1. रस्ते दुरूस्तीचे प्लॅनिंग खड्डे पडायच्या किती तरी आगोदर केले पाहिजे. संभाव्य दुरुस्तीचा आराखडा बनवून, त्या करता निविदाबनवून व मंजूर करे पर्यंत खूप वेळ लागतो. झटपट बनवल्या तर त्यात त्रुटी राहतातच वर बराच जास्त निधी खर्च होतो. आणि इतकेकरून काम समाधान पूर्वक होत नाही. रस्ता दुरुस्ता करता निरनिराळी कामे करावी लागतात जसे, डांबर-खडीचा थर खोदणे, खडीचाथर खोदणे, त्या खालील पाण्या मुळे फुगणाऱ्या मातीचा थर खोदणे, खोदलेले साहित्याचे वेगळे ढीग करणे, निरउपयोगी मातीचीविल्हेवाट लावणे, चांगल्या मातीचा भराव टाकणे, खडी पसरणे, डांबर-खडी मिश्रणाचा लेप देणे, प्रत्येक थर रोडरोलरने काँपॅक्टकरणे, थर 15 सेंटीनिटर पेक्षा जाड असेल तर एका पेक्षा जास्त थर देणे वगैरे. रस्ता दुरुस्ती करता पावसाळ्यात साहित्य मिळणेखर्चिक असते. ते उन्हाळ्यात साठवून ठेवावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून वेळापत्रक बनवावे व पाळावे.2. भूस्तर शास्त्रानुसारसंबंधित प्रवीण शास्त्रज्ञा कडून सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करून घ्यावे. त्यानी शहराच्या निरनिराळ्या भागात पाणी मुरवण्याची न्युनतमखोली सागावी, जेणे करून त्या खोली खाली पाणी मुरवले तर इमारतीना धोका हाणार नाही. सर्व इमारत धारकानी आपापल्याहद्दीतील पाणी त्या खोलीच्या खाली मुरवावे.3. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अर्धा मीटर किंवा त्या पेक्षा खोल गटारे असावीत. या गटारामध्ये ठराविक अंतरावर पाणी मुरवण्याची सोय असावी. 100 ते 500 मीटर अंतर सोईचे होऊ शकते. भूस्तर शास्त्रज्ञ त्या बाबत योग्यमार्गदर्शन करू शकतील.
4. रस्ता बांधण्याच्या जागी असलेल्या मातीचे परीक्षण करून धोकादायक खोली पर्यंतची माती काढून टाकावी. सध्या अस्तित्वातअसलेल्या रस्त्यांचीही अशी पाहणी करून निदान खड्डे पडलेल्या भागातील अशी माती काढून टाकावी. जी माती पाणी शोषूनघेतल्यावर फुगते ती माती रस्ता बांधायला निरूपयोगी. माती फु गली तर रस्ता उचलला जातो व रस्त्याला प्रथम भेगा व शेवटी खड्डापडतो. उत्तम रस्ता म्हणून जंगली महाराज मार्ग, फ र्र्गसन मार्र्ग, पाषाण मार्र्ग या रस्त्यांची वाखाणणी होते. त्या मागील गुुपितत्या खालील खडक हे आहे. खडक हा रस्त्याकरता निसर्गाचे वरदान आहे.5. रस्त्या करता भराव टाकताना नैसर्गिक वाळू उत्तम. तीनसेल तर कृत्रिम वाळू चालेल. ते ही खर्चिक वाटले तर निदान उत्तम प्रतीचा कुजका खडक (मुरूम) तर पाहिजेच पाहिजे. सध्याचेरस्त्यातील खड्डे बुजवताना या खोेली पर्यंत किंवा एक मिटर खोल जाणेे अपरिहार्य आहे.6. खोदल्या नंतर हा निम स्तर कॉमपॅक्टकरणेे म्हणजचे पाया मजबूत करणेे आहे. वारंवार योग्य क्षमतेचा रोलर फि रवून, जेथें खड्डे पडतील त्यात भर टाकून व पाणीशिंपडून हा पाया घट्ट करावाच लागतो. गृहिणी पुरण पोळी करताना जशी कणिक तिंबते तसे. वेळोवेळी पाणी मिसळून पीठ टाकूनमनासारखा कणकेचा गोेळा तयार होत नाही तो पर्यंत गृहिणी कणिक तिंबतच राहते. असे केले नाही तर पुरण पोळी फुटते. ती नंतरसांधताच येत नाही. जेथे भराव टाकणेे गरजेचे असते तेथेही याच पद्धतीने काम करावे लागते. ते करताना एकदम पूर्र्ण भराव टाकूनचालत नाही. छोट्या छोट्या थरा मध्ये करावे लागते. हे करताना रस्त्याच्या पातळीवर बारीक नजर ठेवावी लागते. अगदी पायापासून रस्त्याच्या मध्याकडून कडेच्या गटारा पर्यंत योग्य उतार असलाच पाहिजे. अगदी रस्त्यावर पाण्याचा एक थेंब जरी पडला तरीतो गटारात वाहून गेेलाच पाहिजे.7. पाया व्यवस्थित झाला म्हणजे पुढील काम सोपे होते. योग्य प्रतीचा माल, योग्य पाण्याची मात्रा, पुरेपूर कॉम्पॅक्शन, व प्रत्येक थरात योग्य उतार या बद्दल दक्ष राहिले पाहिजे
8. असा रस्ता तयार केल्यावर डांबरी करणा आधी हा रस्ता वाहतुकीला मोकळा सोडावा. कामातील त्रुटी या काळात निदर्शनालायेतात. या वेळी अशा त्रुटीवर इलाज करणे सोपे असते. एखादा पावसाळा असा रस्ता वापरला तर त्या मध्ये दोष दिसतीलच परंतु तेकमी किंमतीत दूर करता येतील व नागरिकाना कमीत कमी त्रास सहन करावा लागेेल. डांबरीकरण एक पावसाळा जाई पर्यंतलांबवता येत नसेल तर दुरुस्तीचा खर्च वाढेल.
9. जुने रस्ते सावरण्याचा हाच मार्र्ग. जुन्या रस्त्यावर काम करताना ठिगळे लावल्या सारखेे दिसेल (त्याला ऊपाय नाही). जेंव्हाखात्री होईल कीं, पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता नाही तेंव्हा संपूर्र्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे.
वाहनचालक
वाहनचालकांना शिस्त पाहिजेच परंतु त्य बरोबर इतरही आवश्यकता आहेत. त्या पाहू या.
1. नियमांची माहिती व प्रशिक्षण.
2. मनावर ताबा.
3. अनुभव.
4. शिक्षा.
प्रत्येकाला वाटते वाहन चालवण्यास असे काय विशेष ज्ञान लागते. गाडीत बसले, किल्ली फिरवली की गाडी सुरू होते व चालू लागते. तीओढावी लागत नाही. स्वयंचलित असते. नंतर चाक फिरवून दिशा देता येते व अॅक्स्लरेटर दाबून पाहिजे तसा वेग वाढवता येतो. यामध्ये न येण्यासारखे काय आहे? त्या करिता शिक्षणाची काय आवश्यकता? फार झाले तर 1-2 दिवसांचा अनुभव असला म्हणजेझाले. परंतु, नियम माहितू करून घेऊन व त्यांचे पालन केले तर बरेचसे अपघात टाळता येतील. अपघात टाळणे हे वाहनचालकाकरिताचांगली गोष्ट आहे व इतरांचे जीवन सुरक्षित करते.
रस्ता हा सर्वाकरिता आहे.
वाहनचालकांची अशी धारणा आहे की ज्याचे वाहन जास्त किंमतीचे त्याला बाकी सर्वानी वाट द्यावी. ते हे विसरतात की, रस्त्यांवरपहिला हक्क पादचाऱ्यांचा आहे. जास्त गतीच्या वाहनांनी कमी गतीच्या वाहनांना सांभाळून घेतले पाहिजे. मोठ्या वाहनांनी छोट्यावाहनांना वाट करून दिली पाहिजे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत.रहदीरीचे नियम सध्या फक्त प्रादेशिक आर. टी. ओ. कार्यालयात लावलेले दिसतात. हे जास्तीत जास्त ठिकाणी ठळकपणे पाहवयास मिळाले पाहिजेत. वाहनतळांवर तर हे प्रवेशदारांतलावता येतील. निरनिराळ्या इमारत व गृहप्रकल्पामध्ये हे सहज दिसतील अशा ठिकाणी लावावेत. टी. व्ही हे एक मोठे साधनआपल्याला उपलब्ध आहे. टाटानी आपल्या चहाच्या जाहिरातीत निवडणूक प्रतिनिधी कसा असावा हे मोठ्या खुबीने दाखवले आहे. याचा कित्ता रहदारी नियमांचे प्रशिक्षण देण्याकरिता गिरवावा.

3 comments:

Unknown said...

http://savadhan.wordpress.com/
कृपया येथे वाचा व मत व्यक्त करा.
p.d.kulkarni

Unknown said...

आपण अतिशय सुंदर विवेचन केलेआहे. तथापि याला वाचक कां मिळत नाहित.हे विचार सर्वसामान्य लोकांसमोर जाणे आवश्यक आहे.आपण आपली हि दिनिका मराठीमंडळी.कॉम शी अवश्य जोडावी अशी विनंती आहे
http://savadhan.wordpress.com

Janahitwadi said...

जोडायला मला आवडेल. परंतु, ते कसे जोडायचे ते माहित नाही. आपण मदत करू शकल्यास आभारी राहीन.

Popular Posts