Tweet

Saturday 2 July 2011

अमेरिकेवर कितपत विश्वास ठेवावा!

अमेरिकेमुळे भारताला फायदे झाले आहेत. परंतु, हे फायदे मैत्रीमुळे झाले असे म्हणता येणार नाही. अमेरिका जे करते ते स्वतःकरता. मित्राला फायदा व्हावा हा अमेरिकेचा उद्देश कधीही नसतो. फायदा होत असेल तर तो एक बायप्रॉडक्ट असतो. भारतीय संस्कृतीत मित्राकरिता आवश्यकतेनुसार प्राण देणे
सुद्धा अभिप्रेत आहे. अमेरिकेत ते नाही. यामुळेच पाकिस्तान अमेरिकेकडून मदत घेतो व ती भारताविरुद्ध वापरतो. अमेरिकेला त्यामध्ये काही गैर वाटत नाही. अमेरिकेला छळणाऱ्या अतिरेक्यांवर जो पर्यंत पाकिस्तान कारवाई करत आहे तो पर्यंत अमेरिका मदत देत राहणार, मग ती मदत भारताविरुद्ध वापरली तरी. आपला समज आहे की, अमेरिका इस्राईलला मित्र मानते. तिने इस्राईलला भरपूर मदत केली व करत आहे. परंतु उद्या अरबराष्ट्रातील तेल संपले तर हीच अमेरिका इस्राईलला मदत करणे बंद करेल. अरबानी संपूर्ण इस्राईल भस्म केले तरी ती ब्रही काढणार नाही. उलट ते करण्याकरता लागणारी शस्त्रे पैसे घेऊन अरबाना पुरवेल.
हे लक्षात घेऊन भारताने स्वतःचे रक्षण करण्याकरिता सिद्ध झाले पाहिजे. आपल्याला निरनिराळ्या आघाड्यावर लढणे भाग आहे. गरीबी, संपत्तीची भारतीयांतील असमान वाटणी, नक्षलवादी, माओवादी, शेजारील राष्ट्रे व आपला मोठा शत्रू चीन. पाकिस्तानकडे 100 पेक्षा जास्त अणुबाँब आहेत. पाकिस्तान ते सर्व भारताविरुद्धच वापरणार. असे काही होण्याआधी पाकिस्तानला धडा शिकवणे अपरिहार्य आहे. नक्षलवादी-माओवादी यांच्याविरुद्ध श्रीलंकेने जशी लिट्टेविरुद्ध कारवाई केली तशी करणे आवश्यक आहे. या सर्व आघाड्यांवर लढण्याकरिता भारताने स्वतःची ताकद वाढवली पाहिजे. भारतात सुराज्य स्थापन झाले पाहिजे. वेळ येताच एकावेळी एका शत्रूला गाठून त्याचा नायनाट केला पाहिजे. भारत शक्तीमान झाला तरच आपण सर्व शत्रूंशी दोन हात करून यशस्वी होऊ शकतो.

No comments:

Popular Posts