Tweet

Monday, 7 October 2013

What is Blind Faith (Andhshraddha)?



What isBlind Faith (Andhshraddha)?
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये नेमका काय फरक आहे हे विद्वानांनाही सांगता येईल अथवा नाही हे सांगणे जवळ जवळ अशक्य आहे. मनुष्याला कोठलीही गोष्ट प्रत्यक्षात उतरविण्याकरिता श्रद्धा असणे अनिवार्य आहे. कोठलेही कृत्य करण्याकरिता त्यावर श्रद्धा असणे आवश्यक आहे. निदान ते कर्म करवून घेणारावर श्रद्धा असलीच पाहिजे. श्रद्धेशिवाय मनुष्य काहीही करत नाही. समाजोपयोगी कामे करण्याकरिता श्रद्धा नितांत आवश्यक आहे. अंधश्रद्धा अशा कामाकरिता श्रद्धेपेक्षा जास्त उपयोगी पटते. जर अंधश्रद्धा असेल तर मनुष्य कसलाही
विचार करता कर्म करत राहतो. श्रद्धेचे मात्र असे नाही. या प्रकारात कर्म करताना मनुष्य विचार करून निर्णय घेतो त्याप्रमाणेच कर्म करतो. समाजाच्या भल्याकरिता साधुसंत अंधश्रद्धेचा उपयोग करत आलेत. प्रश्न निर्माण होण्याचे कारण समाजातील पुजारी (Pastor) वर्ग आहे. पुजाऱ्यांनी अंधश्रद्धेचा उपयोग वैयक्तिक फायद्या करिता करून घेतला.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा धर्माशी कसलाही संबंध नाही. तो संबंध पुजारी वर्गामुळे निर्माण झाला. भारतामध्ये पुरातन काळी धर्माची चांगली ओळख होती. धर्म हा दोन भागात विभागला गेला आहे. पहिला भाग वेदान्त म्हणजेच तत्वज्ञान. हा भाग वैश्विक चिरंतन आहे. त्यामुळेच संपूर््ण विश्वात एकच धर्म आहे असे समजले जाई. धर्माला नांव नसण्याचे हेच कारण असावे. दुसरा भाग मनुष्याला व्यवहारात तत्वज्ञान उतरवण्यास मदत करतो. हा भाग नैसर्गिकरित्या सापेक्ष आहे. या भागाला स्मृती असे समजले जाई. कमीत कमी तीन व्यवहारिक कारणामुळे विश्वात फक्त एकच स्मृती असू शकत नाही. प्रत्येक मनुने आपली वेगळी स्मृती बनविली. कमीत कमी स्थल, काल समाज हे स्मृतीमध्ये बदल करण्यास कारणीभूत होतात. स्वामी विवेकानंदानी ही माहिती समोर आणली. संपूर्ण जगात (विश्वात सुद्धा म्हणता येईल) वेदान्त एकच आहे. स्मृती मात्र वेगवेगळ्या आहेत. असे म्हणता येईल की  जगात शांतता नसण्याचे कारण वेदान्त विसरून प्रत्येकजण स्मृतीलाच धर्म समजतो हे आहे. एवढेच नाही तर स्मृतीला विश्वव्यापी चिरंजीव समजण्याची गल्लत करतो. यामध्ये पुजारी वर्गाचा पूर्णपणे सहभाग आहे. एवढेच नाही तर समाजातील जवळ जवळ प्रत्येकाची खात्री आहे की पुजारी सत्य सांगत आहेत. त्यामुळे समाजातील मोठा वर्ग पुजाऱ्यांच्या सागण्यावर कसलाही विचार करता विश्वास ठेवतो. कसलाही विचार करता विश्वास ठेवणे म्हणजेच अंधश्रद्धा. पुजारी जनतेच्या या श्रद्धेचा म्हणजेच अंधश्रद्धेचा वापर स्वतःच्या फायद्याकरिता करून घेतात. अंधश्रद्धेचा वापर समाजहिताकरिता होत असेल तर ती अंधश्रद्धा शाप ठरता वरदान ठरली असती.
25-30 वप्षांपूर्वी ²ÖÖ²ÖÖ वाक्यम् ¯ÖÏ´ÖÖÞÖ´ÖË…अशी परिस्थिती होती. आई, वडिल, आजी, आजोबाच काय कोठल्याही वडिलधारी व्यक्तीने सांगिलेले हिताचेच आहे अशी मुलांची डोळे झाकून श्रद्धा होती. वडिलधारी मंडळी आपले हितच चिंततात याची खात्री होती. हल्ली काळ बदललाय. लहान मुले देखील लगेच विश्वास ठेवत नाहित. आधी खात्री करून घेतात की व्यक्ती वडिलधारी असली तरी विश्वास ठेवण्या योग्य आहे का फसवणुक करणारी आहे. सहसा अनोळखी व्यक्तिवर विश्वास ठेवत नाहित आणि हे शंभर टक्के बरोबर आहे. या बदलेल्या परिस्थितीचा अर्थ लोक अधर्मी झाले असा कदापी होत नाही. लोक चौकस झाले असे म्हणता येईल.
धर्माच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. तरीसुद्धा पुष्कळ वेळी लोक लोभाला बळी पडतात. पुजारी लोकांचा प्रभाव इतका आहे की, पुजारी सांगतील त्यावर पटकन विश्वास ठेवतात. मला एक गोष्ट आठवते. महादेव शंकर आपली पत्नी पार्वती बरोबर विश्वात भ्रमण करत होते. त्याना पृथ्वीवर एक ब्राह्मण एका मंदीरात शिवशंकराची पूजा करताना दिसतो. देवी पार्वतीच्या मनात कुतुहल निर्माण झाले ती महादेवाना त्या मंदीराजवळ थोडा वेळ थांबण्याला सांगतात. तो ब्राह्मण मन लावून पूजा करत होता. तेथे साक्षात महादेव पत्नी पार्वती समवेत आलेत हे ही त्याला समजले नाही इतका तो पूजेत मग्न होता. देवी पार्वतीने महादेवाना विचारले की तो ब्राह्मण इतक्या तन्मतेने पूजा करतो तरी तो दरिद्री का? महादेवानी पार्वतीला सांगितले की, प्रत्येकजणाला स्वतःच्या कर्माचे फळ मिळते. त्यालाही ते मिळत आहे. देवी पार्वतीला हा खुलासा मानवला नाही. तिने सांगितले तो तुमची पूजा करतो आणि ही नेहमीच करत असावा त्याचे त्याला काहीच फळ मिळणार नाही काय? महादेवानी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानी हे ही सांगितले की विधात्याच्या नियमाविरुद्ध मी काहीच करू शकत नाही. विधात्याने कोठल्या कर्माला कोठले फळ द्यावयाचे हे निश्चित केले आहे. मी त्या ब्राह्मणावर कसलीही कृपा करू शकत नाही. त्याला त्याच्या कर्माचे फळ अवश्य मिळेल. इतके सांगूलही पार्वतीने आपला हट्ट सोडला नाही. नाईलाजाने महादेव त्या ब्राह्मणाला पोतेभर सोने द्यावयास तयार झाले. त्यानी सोन्याच्या विटानी भरलेले पोते ब्राह्मणाच्या परतीच्या रस्त्यावर ठेवले. देवी माता पार्वती उत्सुकतेने काय होते हे पाहत होत्या. पूजा आटोपून ब्राह्मण घरी जाण्यास निघाला. माता पार्वतीला वाटले की आता ब्राह्मणाला सोने सापडणार त्याचे दारिद्र्य दूर होणार. महादेवाना थोडी अपराधीपणाची चिंता वाटत होती. त्यानी पत्नीचा हट्ट पुरविण्याकरिता विधात्याचा नियम मोडला. त्यामुळे त्यानाही उत्सुकता होती. ब्राह्मण परतताना विचार करत होता की, आपण कित्येक वर्षे या रस्त्याने जातो येतो तर डोळे मिटूनसुद्धा मी घरी जावू शकतो. लगेच त्चाने डोळे मिटून घरी परतण्यास वाटचाल सूरू केली. डोळे बंद असल्याने त्याला सोन्याच्या विटा असलेले पोते दिसलेच नाही. त्यामुळे त्याला सोने असूनही मिळाले नाही. तातपर्य कर्माचे फळ प्रत्येकाला मिळते त्यात कमी जास्त होत नाही. दुसरा मुद्दा असा की, देवाला नवस करणे याचा अर्थ काय? नवस करताना असे म्हटले जाते की देवा मला अमूक तमूक दे मी तुला सोन्याचे सिंहासन देईन. पहिला प्रश्न असा की विश्वातील प्रत्येक वस्तू ही ईश्वराची असेल तर त्यातील एक वस्तू देवाला वाहणारे तुम्ही कोण? दुसरा प्रश्न असा की देवाला अमिष दाखवून त्याचेकडून काम करून घेणारे तुमाही कोण? सरकारी कार्यालयात असे केले तर त्याला लाच असे संबोधले जाते. मग नवस म्हणजे देवाला दिली जाणारी लाच असे का समजू नये? देवाला लाच देणे कायदेशीर आहे काय? सर्वसामान्य जनतेची पुजाऱ्यानी केलेली करत असलेली ही फसवणूक अंधश्रद्धेतूनच होते. आणि संमाजोपयोगी कामेही अंधश्रद्धेतूनच होतात. याला निस्सीम श्रद्धा असेही संबोधले जाते. जे काही कार्य करावयाचे असेल ते समाजोपयोगी असेल तर त्याकरिता जनतेत अंधश्रद्धा निर्माण करणे योग्य आहे.  आतापर्यंत हेच झाले आहे भविष्यातही असेच व्हावे.
भगवान श्रीकृष्ण, बौद्ध, महावीर, येशु ख्रिस्त, महम्मद पैंगबर, गुरू गोविंदसिंह अशा ज्ञानी, निस्वाःर्थी, समाजाची नाळ जाणणाऱ्या महापुरुषानी वेदान्ताचा व्यवहारात उपयोग कसा करावयाचा हे सांगितले. समाजात चार प्रकारच्या व्यक्ति असतात. त्यामुळे जनतेला कोठल्या प्रसंगी कसे वागावे हे समजण्याकरिता यानी नियम बनविले. ते देवाने सांगितले अशी अंधश्रद्धा निर्माण केली. त्यामुळे हे नियम पाळले जातील याची खात्री निर्माण झाली. कालांतराने या नियमांची पार्श्वभूमीचा विसर पडल्याने किंवा समजल्याने या नियमांचा दुरुपयोग होऊ लागला. त्यामुळे ज्ञानी लोकानी दुसऱ्या टोकाची भूमिका घेतली. धर्मावरील श्रद्धेला चुकीचे ठरविले गेले. जनतेला वेदान्त स्मृती समजाऊन देण्याऐवजी मी म्हणतो ते खरे अशी भूमिका घेतली गेली. त्याचा परिणाम जनता विरुद्ध समाजकारणी अशी तेढ निर्माण झाली. खरे म्हणजे समाजकारणी व्यक्तीनी धूर्तपणे जनता विरुद्ध पुजारी यांची लढाई लावून दिली पाहिजे होती. हा मार्ग लांबचा आहे. त्यांचे फलित मिळण्यास 100 किंवा जास्त वर्षे लागू शकतात वगैरे खरे असले तरी त्याचा परिणाम समजामध्ये नकळत शास्वत बदल होण्यात होईल. सुधारीत स्मृतीला मान्यता मिळेल ती वर पहिल्या सारखी श्रद्धाही निर्माण होईल. एकदा श्रद्धा निर्माण झाली तर नवीन स्मृतीचेही पहिल्यासारखेच पूर्णपणे पालन होईल. माझे म्हणणे सत्य आहे ते स्वीकारलेच पाहिजे अशी भूमिका नसावी. अशा भूमिकेचा अर्थ स्वतःचे म्हणणे  इतरांवर लादणे असाच होईल.
समाजाला कसे पटवून देता येईल ते ज्ञानी, निर्लोभी, निस्वार्थी लोकच ठरवू शकतात करून दाखवू शकतात. सध्यातरी अशी व्यक्ती दृष्टीपथात नाही. कोणाला माहित असेल तर अवश्य त्या व्यक्तिशी संबंध प्रस्थापित करून हा तिढा सोडवण्यास मदत करावी.

No comments:

Popular Posts