![]() |
| Pimprichinchwad Corporation Main Building |
पिंपरीचिंचवडशहर जरी विचारात घेतले असले तरी या लेखातील माहिती सर्वच शहरांना
लागू पडते. शहरविकासाची जबाबदारी नगरनिकास खात्याची आहे. हे खाते कोण्याकाळी बनविलेली
नियमपुस्तिका अजूनही वापरते. ज्या काळी पाणी, वीज, मलनिस्सराण, रस्ते, सार्वजनिक वाहतूक
व्यवस्था वगैरे सुविधाना फारसे महत्त्व नव्हते व फक्त चटईक्षेत्रच महत्त्वाचे होते
त्या काळचे नियम वापरून बांधकामांना परवानगी दिली जाते. बांधकामे झाल्यावर सुविधांचा
विचार होतो. त्याकरिता जागा उपलब्ध नसते. त्यामुळे जागा मिळविण्याकरिता खूप खर्च योतोच
परंतु, बहुतेक वेळा जागाच उपलब्ध नसते. त्यामुळे सुविधाच पुरविल्या जात नाहित. राजकारणी
लोक जनतेला मदत करण्याकरिता अव्वाच्या सव्वा मागण्या करतात.










































