Tweet

Saturday, 13 February 2010

भाजप व रास्वसं यांची अडचण.

भाजप व रास्वसं यांची अडचण होण्याचे मुख्य कारण त्यांच्या स्वतःच्या विचारात आहे. रास्वसं चे कर्म तपासले तर ते निरपेक्ष आहे, अगदी धर्मनिरपेक्ष सुद्धा. कोणाला आपत्तीत मदत करताना ते धर्म-जात पाहत नाहीत.
ती व्यक्ती संकटात आहे व तिला मदत पाहिजेएवढेच जाणून मदत करतात. परंतु, कर्माने ते जे मिळवतात ते बोलण्याने घालवतात. त्यांनी आपली विचारसरणी काळाप्रमाणे बदललीपाहिजे.
प्राचिनकाळी जगभर लोक टोळ्याटोळ्यानी राहत असात. टोळी ज्या भूभगात वास्तव्य करत असे ते त्यांचे राष्ट्र व समाजात बंधुभावनिर्माण करण्यास जे नियम होते तो त्यांचा धर्म. त्याकाळी धर्म व राष्ट्र एकच असे. जगात जेवढे धर्म होते, आहेत किंवा भविष्यातनिर्माण होतील त्यां सर्वांचे मूळतत्त्व मात्र बंधुत्त्व हेच आहे. कालानुसार, प्रदेशानुसार, समाजानुसार नियमांत मात्र वेगळेपणा दिसतो. त्याला काही पर्याय नाही. परंतु त्यावरून धर्म आळखणे ही मोठी चूक आहे. धर्मावर श्रद्धा म्हणजे बंधुत्त्वावर श्रद्धा असा अर्थ घेतलापाहिजे. हे बंधुत्त्व स्वीकारताना राष्ट्र हा विचार मनात असावा. जशी दळणवळणांची साधने विकसित झाली तसा राष्ट्राचा आकार वाढतगेला. शूर राजे इतर राष्ट्रांचा पराभव करून त्यांना आपल्या दावणीला बांधत. त्यातून सम्राट ही संकल्पना रुढ झाली. पुढे सम्राटांचीशक्ती क्षीण होत गेली व छोटी राष्ट्रे आपापला व्यवहार स्वतंत्रपणे करू लागली. अशा स्थितीत परकिय आक्रमणापुढे छोट्या राष्ट्रांचानिभाव लागला नाही. चाणक्य हे पहिले महापुरुष असावेत की ज्यानी प्रबल शत्रु विरुद्ध छोट्या राष्ट्रांना एका छत्राखाली आणून संघराज्यबनविले. अशाप्रकारे शत्रुभयामुळे छोट्या छोट्या राष्ट्रांचे संघही निर्माण झाले. ग्रीकांना आर्यावर्तातून हाकलून लावण्याचे कार्य यामुळेशक्य झाले. परंतु शत्रुभय संपल्यावर हा संघ (संघराज्य) विस्कळित झाला.
त्यामुळे जेंव्हा मुसलमानानी भारतावर आक्रमण केले तेंव्हा सुरवातीच्या विजयांनंतर पराभव पत्करावा लागला. मुसलमानांनीभारतामध्ये पाय रोवल्यावर सुरवातीला सबुरीने घेतले परंतु नंतर त्यांची धर्मांधता त्याना लपविता आली नाही. मोगलांनीही सत्ताराबविण्याकरिता इतरांना सवलती दिल्या व ऐषारामात औरंजेब येई पर्यंत जीवन व्यतित केले. श्री छत्रपति शिवाजी महाराजांनीऔरंजेबाच्या मनिषा सफल होऊ दिल्या नाहित. त्यामुळे मुसलमानांना सबुरीने घ्यावे लागले. त्याचबरोबर भारतात त्यांचा जन्मझाला, येथेच वाढले व मृत्यु पावले त्यामुळे सहाजिक त्याना देशाबद्दल प्रेम उत्पन्न झाले. हे होईपर्यंत यूरोपिन राष्ट्रे (व सर्वात मोठा शत्रूइंग्लंड) या रुपाने नविन शत्रू उत्पन्न झाले. भारत त्यावेळी संघटित होऊ शकला नाही व त्यामुळे इंग्रजांची गुलामगिरी पत्करावीलागली. इंग्रजानी हिंदू भारत व मुसलमान भारत अशी दोन राष्ट्रे हिंदुस्थानांत निर्माण केली व दुहीचा फायदा घेऊन सुखनैव राज्य केले. स्वातंत्र्य देतानाही आतापर्यंत फक्त विचारात असणारी राष्ट्रे जमीनीवरही अवतरली. इतिहापासून धडा घ्यावयाचा असतो व उमगलेल्याचुका पुन्हा करायच्या नसतात. रास्वसं व भाजपने इतर सर्वाबरोबर हे ध्यानांत घेतले पाहिजे. संघटना ही भारतीयांची करावी, कोण्याएका धर्माची नको. हे प्रत्यक्षात आणण्याकरिता आपल्या राष्ट्राने स्वीकारलेल्या घटनेत अति योग्य तरतूद आहे. ती म्हणजेधर्मनिरपेक्ष समाज व शासन व्यवस्था. हे जेंव्हा रास्वसं व भाजपला उमगेल तो दिन भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहावा.
भाजपला बहुमत का मिळत नाही? त्यांच्या हिशेबाने 80 टक्के जनता हिंदू आहे. या जनतेला संगठित केले तर हुकमी बहुमत मिळेल. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. अनुसुचित जाति व जमाती 25 टक्के असाव्यात. त्या मध्ये मुसलमान व इतर धर्मिय मिळवले तर हीटक्केवारी 40 पेक्षा जास्त होईल. इतर मागासवर्गिय 30 टक्क्यापेक्षा जास्त आहेत. त्यामधून शीख व जैन वगळले तरी ही जनता 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या गटातील मतदार मोठ्या संख्येने मतदान करतात. मतदानाची टक्केवारी 50 ते 90 टक्क्यापर्यंत असूशकते. राहिलेल्या गटातील लोक सुखवस्तु आहेत व मतदानात सहसा भाग घेत नाहित. त्यांची टक्केवारी 20 ते 30 टक्के असू शकते. त्यामुळे जेथे कमी मतदान होते तेथे पहिल्या गटातील 50 व दुसऱ्या गटातील 20 टक्के याचा अर्थ प्रत्येक गटाचा एक एक उमेदवारगृहित धरल्यास पहिल्या गटाच्या उमेदवारास 35 टक्के मते व दुसऱ्या गटाच्या उमेदवारास 6 टक्के मते असा होतो. हे मतदानसुधारले तरी हिदुत्त्वाच्या जोरावर 25 टक्के मते मिळू शकतात. एवढ्या मतावर निवडुन येणे अशक्य आहे. काँग्रेसने हे गणितओळखले. त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घेतला व बहुतेक ठिकाणी बहुतेक वेळा बाजी मारली. ज्या ठिकाणी त्यांचा पराभव होतो तेथेइतर मुद्दे प्रभावी असतात. अटलबिहारीनीही हे रणित ओळखले. त्यांना धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व कळाले. परंतु ते प्रत्यक्षातआणण्याकरिता इतर पक्षांचे पाय धरावे लागले. रास्वसं व भाजपने हे गणित समजून घ्यावे व धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार करुन आपलेबस्तान बसवावे.
भारतीय संस्कृती व समाज तसा पुरातन काळापासून सर्वसमवेशक आहे. ही सर्वसमावेशकता फक्त मनुष्यांपर्यंत सीमित नाही. त्यामध्यें सर्व प्राणीच काय परंतु वनस्पती व पंचमहाभुतेही सामील आहेत. वासुकी सारखे सर्प, जटायुसारखे पक्षी, महावीर हनुमान, पर्वत हे ही समाजाचे अभिन्न अंग मानले गेले आहेत. भारतामध्ये बाहेरुन आलेले शक, हूण हेही येथलेच होऊन राहिले. अशापरिस्थितीत हिंदू समाज, मुसलमान समाज, ख्रिस्ती समाज असे भेदभाव करणे हे भारतीय संस्कृतीत बसत नाही व ते अन्यायकारकआहे.
मला रास्वसं वा भाजपचा विनाकारण पुळका नाही. रास्वसं चे कार्यकर्ते घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजतात. निस्वार्थपणे कामकरतात. ते कर्मयोगी आहेत. असे कार्यकर्ते राजकारणात आले तर भारताच्या ते हिताचे आहे. त्याकरिता त्यांनी भारतीय संस्कृतीपूर्णपणे स्वीकारली पाहिजे, निवडणुकीतील उमेदवाराचा खर्च जवळ जवळ शून्य केला पाहिजे व शासन व्यवस्थेत निवडुन आलेल्याप्रत्येकाला अधिकार व जबाबदारी वाटुन दिली पाहिजे. हे कसे करावयाचे ते मी पूर्वी सांगितले आहे. पुन्हा पाहवयाचे असेल तर येथे भेटद्या.
धर्मनिरपेक्ष, जनसंचालित, भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, संघटीत, समर्थ, विकसित भारत हे स्वप्न सर्वांनी पाहावे व त्याकरिता प्रयत्नकरावेत.

2 comments:

Unknown said...

आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. परंतू सर्वात जास्त भ्रष्टाचार भाजपा च्या कारकिर्दीत झाला. किंबहूना त्याचा वेग वाढला.बर्‍याच वाईट गॊष्टीना आळा बसेल असे तेव्हा वाटले होते.पण झाले उल्टेच. आता लोकांचा कोणावर ही विश्वास नाही. मध्यमवर्गीय मतदान करत नाही.त्याला ही तशीच कारणं आहेत.आता अजून एक प्रयोग जाणिवपुर्वक कराय्ला पाहिजे.मतदान यंत्रावर "यापैकी कोणीही नाही" असे बटन आवर्जून ठेवायला पाहिजे.जे कर्मचारी मतदान करत नाहीत,त्यांची रजा बिनपगारी करायला पाहिजे.जे मतदान करतील त्याना विशेष सवलत जाहीर करायला पाहिजे.इ.
मी Savadhan's Blog लिहितो.तो हि आपण अवश्य पहावा.
पीडीकुलकर्णी

Anonymous said...

तुम्ही केलेली ही मिमांसा १००% खरी आहे.पण या मंडळीना हे कॊण सांगणार? ते निरपेक्षपणे काम करतात. पण त्यांच्याच २-४ वर्षाच्या राजवटीत भ्रष्टाचार शिगेला पोचला.जनतेचा विश्वास संपला
हे वाचा http://savadhan.wordpress.com/2009/12/22/जनतॆच्या-पैशाचा-
PDKulkarni

Popular Posts