Tweet

Thursday 20 January 2011

हा तर खेळ झाला


एक दुसऱ्याची उणी काढून हसणे अधवा एकदुसऱ्याला शिव्या देणे हा लहान मुलांचा खेळ. एक दुसऱ्याची कुलंगडी काढणे, एक दुसऱ्यावर आरोप करणे हा राजकारण्याचा एकमेकावर श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा डाव. रास्वसं या मध्ये बसत नाही. संघाने आपले नियम बनवावेत व पाळावेत.
कोणी श्री मोदींची स्तुती केली म्हणून हुरळून जाऊ नये अधवा टीका केली म्हणून लिराश होऊ नये. संघाला आपली गुणवत्ता काँग्रेससारख्या पक्षाला पटवून देण्याची आवश्यकता नाही. कोणी स्तुती केली तर त्याला शाबासकी द्यावी. स्पष्ट व स्वच्छ मत व्यक्त केले म्हणून आभार मानावेत व असेच भविष्यात कराल अशी आशा आहे म्हणून सांगावे.

श्री मोदींना कोणी चांगले म्हटले म्हणून मोदीनी केलेल्या सर्वच कृत्यांचे समर्थन होत नाही. दंगलीनंतर त्यानी जे केले त्याची प्रशंसा केली आहे. त्याचा अर्थ भविष्यातही मोदीनी असेच वागावे असा घेतला पाहिजे. मुसलमानांना मारत राहावे असा नाही. मूळात हिंदू हा धर्म नाही.

भारतामध्ये हजारो धर्म आहेत. या सर्व धर्मांचे हिंदू हे गटबंधन आहे (Confederation). प्रत्येक जात एकमेकासारखी दिसत असली तरी ती एकाच धर्माची शाखा मानणे चूक आहे. त्यामध्ये बाहेरून आलेल्या ख्रिच्शन, मुसलमान, यहुदी (ज्यू), पारशी व भारतात निर्माण झालेले जैन, बौद्ध, शीख तसेच इतरही अनेक धर्म आहेत. शिवलिंगपूजा आपण द्रविडांकडून घेतली. परंतु, आजही तामीळनाडुमध्ये सनातन धर्माला कमी महत्त्व दिले जाते. जातीधर्माच्या नावांवर राष्ट्रस्थापन करण्याकरिता सध्याचा काळ अनुकुल नाही व भविष्यातही ते शक्य नाही. राष्ट्र म्हणजे मनुष्य हा घटक मानून स्थापन केलेला समाज असे माझे वैयक्तिक मत आहे.

संघाने हे समजून घेऊन राजकारणात न पडता वाटचाल करावी असे माझे मत आहे.

No comments:

Popular Posts