Tweet

Wednesday 3 August 2011

बससेवा तसेच बीआरटी:

Suggested Design: BusStop
Railway

Bus Transport
महानगरपालिकांची (किंवा कोठल्याही सार्वजनिक व्यवस्थेची) योग्य वेळी, पुरेशा प्रमाणांत दळणवळणांची साधने पुरविताना सुरक्षा ही प्राथमिक जबाबदारी आहे. असुरक्षित प्रवास साधने म्हणजे खून करणे आहे. बीआरटीलाही हा नियम लागू आहे. बसप्रवाशांना प्रथम बसथांब्यावर सुरक्षितपणेपोहचणे हा सगळ्यात पहिला टप्पा. महापौरांना लिहिलेले पत्र इथे पहा. बसप्रवाशी पदपथावर असेल असे गृहित धरू या. बसप्रवासातील पहिला टप्पा म्हणजे बसथाब्यावर पोहचणे. म्हणजेच बसथांबा पदपथावर नसेल तर तेथे जाण्याकरिता विना अडथळा वाट पाहिजे. रस्ता ओलांडून जाताना इतर वाहनांच्या खाली बसप्रवाशी येऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे.

 सर्वसाधारणपणे खालील प्रकारचे अपघात होऊ शकतात. (सचित्र पाहण्याकरिता प्रत्येक ओळीवर टिचकी मारा (क्लिक करा))
  1. अपघातातील जखमी
  2. पेट्रोलपंपावरून बाहेर येताना
  3. बस पकण्याकरिता धावणारे

बस मध्ये चढताना, आत वसताना किंवा उभे राहताना, ब्रेक लावल्यावर उभे असलेल्या प्रवाशाकरिता वगैरे सर्व प्रकारे बस प्रवासात प्रवाशांची काळजी घेतली गेली पाहिजे. सुरक्षेनंतरचा मुद्दा 'विश्वासर्हता' प्रवाशाना ठराविक कालावधीत बस येईल याची खात्री असली पाहिजे. गर्दीमुळे बस मिळाली नाही तर नंतरची बस 5-10 मिनटात येणार अशी खात्री असेल तर प्रवासी बस मध्ये घुसणार नाहीत. रस्त्यात बस बंद पडणार नाही असा प्रवाशांचा विश्वास असला पाहिजे. वेळेवर बस येईल व वेळेवर ईच्छित स्थळी पोहचू असा विश्वास बससेवेने कमावला पाहिजे. या करिता विना अडथळा वेगळा बसमार्ग आवश्यक आहे.  असा बसमार्ग सर्वच बससाठी असावा. बससेवेचा विचार करताना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सेवेचा वापर करणारे कोण? या करिता सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. तरुण, म्हातारे, पुरुष, स्त्रियां त्याचबरोबर दृष्टीहीन प्रवासी असू शकतात. माझ्यामताप्रमाणे लुळे पांगळे बसने प्रवास करणार नाहीत. व्हीलचेअर वापरणारेही प्रवासाकरिता बस वापरणार नाहित. श्रीमंत व उच्च पगार मिळविणरेही ही सेवा वापरण्याची शक्यता कमी. सर्वेक्षणाअंती खरे बसप्रवासी कोण हे माहित होईल. बससेवा फक्त याच प्रवाशांसाठी असावी. प्रवासी कोण हे निश्चित झाल्यावर बस कशी असावी हे निश्चित करणे सोपे जाईल. जर निधीची कमतरता असेल तर अग्रक्रम ठरवावा. उदाहरणार्थ धडधाकट प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, दृष्टीहीन, अपंग, व्हीलचेअर वापरणारे, लठ्ठपगार मिळवणारे किंवा श्रीमंत वगैरे. अशाप्रकारे नियोजन केले तर निधीची कमतरता भासणार नाही.
बससेवा विश्वासार्ह्य बनविण्याकरिता बसचे आरोग्य व मार्ग या दोन्हींची काळजी त्या त्या सेवा पुरवठादारानी घेतली पाहिजे. सर्वसाधारणपणे बसची बॅटरी पूर्ण क्षमतेने चार्ज केलेली नसते. निदान डेपोमधून बस बाहेर जाताना व येताना बॅटरी तपासणे अत्यंत आवश्यक आहे. एक तर बॅटरी रिचार्ज करावी अथवा बदलून टाकावी. बस मार्गावर सोडताना बॅटरी पूर्ण क्षमतेने चार्ज असलीच पाहिजे. नवीन टर्बोचार्जड् इंजिन पूर्ण ओझे टाकण्यापूर्वी 5 मिनटे आयडल स्थितीत चालवावे लागते. निदान बस डेपोमधून बाहेर जाताना ही काळजी घेतलीच पाहिजे. रोज तपासण्याचे व काळजी घेण्याचे इतरही खूप मुद्दे आहेत. बस डेपोमधून बाहेर जाताना या सर्व मुद्यावर बसचालकाने निरिक्षकाच्या नजरेखाली या सर्व मुद्यांचे पालन करावे व तसे प्रमाणपत्र निरिक्षकाकडून घ्यावे. असे प्रमाणपत्र नसेल तर चालकाला तसेच निरिक्षकाला निलंबित करून चौकशी करावी व दोषी व्यक्तीवर सेवाशर्तीनुसार कारवाई करावी. डेपोमध्ये बस आल्यावर तिची पूर्ण तपासणी करावी व जर काही दुरुस्ती करणे असेल तर ती करावी. त्याची जबाबदारी डेपोतील कर्मचाऱ्यांवर निश्चित करावी. प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित केली असेल तर बसमार्गावर बस बंद पडण्याचे प्रमाण शून्यावर आणता येणे शक्य आहे.

Bus Stop or Death Trap!


Secured Bus Stop
शक्यतो बसमार्ग बसकरिता स्वतंत्र असावा. असा स्वतंत्र मार्ग सध्या रस्त्याच्या मध्यभागाजवळ असतो. तो योग्यच आहे. पदपथाजवळ असा मार्ग बनविला तर इतर अडचणी येतील व त्या दूर करम्याकरिता जास्त निधी लागेल. त्या रस्त्यावर इतर कोठल्याही वाहनांना परवानगी नसावी. प्रत्यक्षात फक्त नियम केल्याने ईप्सित साध्य होत नाही. त्याच बरोबर रस्त्याची आखणी अशी करावी की, त्यामध्ये इतर वाहनांना शिरणे जवळ जवळ अशक्य असावे. पादचारी, सायकलस्वार, स्वयंचलित दुचाकीस्वार अथवा इतर कोठलेही वाहन या मार्गावर येऊच नये अशी सोय असावी. हे साध्य करणे अवघड नाही. बसमार्गावर जाण्याची व बाहेर पडण्याची सोय फक्त ठराविक बसस्थानकांवरच असावी. जेथे ही सोय आहे तेथे इतर वाहनांना अडविणे सोपे आहे. कोणी जबरदस्ती करत असेल तर पोलिसांची मदत घ्यावी. त्याचबरोबर एक नियम करावा की, याउपर कोणी मार्गात आले व एखाद्या बसने त्यांना ठोकरले तर सर्व जबाबदारी जो कोणी उपरा येथे येईल त्याचेवर असावी. बसचालकाला संपूर्ण सुरक्षा पुरवावी व त्याला अपघाताबद्दल दोषी ठरवू नये.
बसथांबा हा महत्त्वाचा घटक आहे. प्रवासी साधारणपणे पदपथावरून येतील. बस येताना दिसली तर ते इकडे तिकडे न बघता बसकडे पळतील. अशा प्रवाशांना बसथांब्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचता आले पाहिजे. यावर उपाय शोधताना मला असे लक्षात आले की बसथांब्यावर जाणे करिता 25-30 मिटर रुंदीचे टनेल असावे. या टनेलचा उपयोग महापालिकांना इतर सुविधा पुरविण्याकरिता होईल. म्हणजे ही इष्टापत्ती समजावयाला हरकत नाही. हे टनेल म्हणजे इतर वाहनांना विनाअडथळा बसथांब्याच्या हद्दीतून जाण्याचा उड्डाणपूल. त्याची उंची 3 मिटरपेक्षा कमी ठेवता येणे शक्य आहे. या उड्डाणपूलाखाली स्वच्छतागृहे, पदपथविक्रेते, पोलिसचौकी, यांची सोय करता येईल. दोन्ही कडच्या उताराच्या सुरवातीच्या भागात सायकल तसेच स्वयंचलित दुचाकी वाहनाकरिता वाहनतळाची व्यवस्था होऊ शकते. त्या सोबत परिवहन संस्थेचे प्रवासी इतर वाहनांकडे वळण्याची शक्यता जवळ जवळ शून्य होईल. कारण इतर वाहने बसथाव्यापासून 50-60 मिटर दूरच थांबू शकतील. सध्या अशी वाहने थाब्याव!रच थांबतात व प्रवासी घेऊन जातात.
Would any One use this Bridge?
बसमार्गाला आडवे छेद देणारे रस्ते असणारच. अशा रस्त्यामुळे बसला थांबावे लागू नये म्हणून बसकरिता उड्डाणपूल किंवा टनेल (भुयारी मार्ग) असावे. पिंपरीचिंचवड शहरात जलद वाहतुकीकरिता पुणे-मुंबई महामार्गावर मध्यावर चार लेनचा  रस्ता बांधलेला आहे. ते एक उत्तम काम झाले आहे. त्या रस्त्यावर एक कमतरता आहे ती म्हणजे वाहनाना 'यू' टर्न घेण्याकरिता तसेंच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरिता पुरेशा सोई नाहित. बसप्रवाशांकरिता मात्र प्रत्येक थांब्यावर सोय करणे आवश्यक आहे.

या लेखामध्ये अभियात्रिकेच्या दृष्टीकोणातून विचार केला आहे. याच प्रकारे इतर दृष्टीकोणातून विचारपूर्वक नियोजन केले तर बससेवा सुरक्षित, सर्वमान्य व पुरवठादारांना योग्य मोबदला देणारी ठरेल.

No comments:

Popular Posts