Tweet

Saturday, 12 March 2011

रहदारीचे नियम तोडणाराना धडा शिकवा!

प्रत्येक समस्येवर उपाय असतोच. समस्या भयंकर तर उपायही तितकेच भयंकर असू शकतात. कांही वर्षापूर्वी वाचले होते की एका मराठी माणसाला आफ्रिकेतील एका देशात रस्ता वाहतुक शिस्त पाहून आश्चर्य वाटले. विचारल्यावर चालकाने जे सांगितले ते ऐकुन त्याचा विश्वासच बसला नाही.
रस्त्यावरुन जाताना ज्यावर आपत्ती कोसळली त्याने रहदारीचे नियम पाळले काय हे सिद्ध केले जाते. जर नियम पाळले नसतील तर त्याला कोठल्याही प्रकारची प्रतिपूर्ति मिळत नाही. तसेच ज्याच्या मुळे आपत्ती कोसळली असेल त्याला नियम पाळले असतील तर कांहीही शिक्षा होत नाही. हा नियम निदान चौकातील रहदारीकरता लागू करावा. प्रत्येक चौकात व्हिडिओ कॅमेरे लावावेत व त्यांचा उपयोग नियम पाळले किंवा नाही हे सिद्ध करण्याकरता करावा.
नियम पाळणे सोपे जावे या करता चौकामध्ये व्यवस्था करावी. माझ्या मते चौक व वेगनियंत्रक, आकृती 1 व 2 प्रमाणे असावेत. चौकामध्ये रस्त्याच्या पातळीत एक मोठा चौरस व त्या चौरसामध्ये रहदारी नियंत्रक पोलीसाकरता 2000 मि. मि. व्यासाचा व 300 मि. मि. उंचीचा गोल चबुतरा असावा. चौरसाच्या चारी बाजूला चौक ओलांडुन सरळ जाणाऱ्या वाहनाकरता 150 मि. मि. खोलीवर रस्ते असावेत. वाहने लेन सोडून इतरत्र जाऊ नयेत याकरता आकृतीत जाड रेषेने चौरसाच्या बाजूवर दाखवल्याप्रमाणे कौंक्रीटचे लेन दुभाजक असावेत. असेच लेन दुभाजक चौकात येणाऱ्या सर्व रस्त्यावर चौकापासून कमीत कमी 25000 मि. मि. लांबी पर्यंत असावेत. लेनची रुंदी 2000 ते 2300 मि. मि. पेक्षा जास्त नसावी. लेन मध्ये फक्त एकच ट्रक जाऊ शकला पाहिजे, जेणे करुन मागचे वाहन पुढच्या वाहनाच्या (चौक ओलांडे पर्यंत) पुढे जाऊ शकणे अशक्य व्हावे. काँक्रीटच्या लेन दुभाजकामुळे वाहनाना एका लेन मधून  दुसऱ्या लेन मध्ये चौक ओलांडल्या शिवाय जाताच येऊ नये.
आकृती 2 मध्ये दाखवल्या प्रमाणे चौकात येणाऱ्या रस्त्यावर 3 ठिकाणी  वेगनियंत्रक असावेत. वेगनियंत्रक बनवण्याकरता निरनिराळ्या त्रिज्येचा अर्धदंडाकृती आकार वापरावा. पहिल्या वेगनियंत्रकामध्ये 30 मि. मि. त्रिज्येच्या अर्धदंडाकृतीचा वापर करावा. यावरुन वाहने जाताना सौम्य धक्का बसेल व चालकाला वेग कमी करण्याचा इशारा मिळेल. दुसऱ्यामध्ये 60 मि. मि. जेणेकरुन वेग कमी केला तर सौम्य धक्का नाहीतर हिसका. तरीही वेग कमी केला नाही तर तिसऱ्या वेगनियंत्रकावर वाहनाचा कणाच मोडला पाहिजे. पाट्यावर सूचना असाव्यातच परंतु,धडा शिकवण्याकरता अशाच प्रकारची पद्धत पाहिजे.
थोडक्यात प्रत्येक आपत्ती मध्ये "नियम पाळले काय?" यावरून प्रतिपूर्ति व शिक्षा ठरवावी व नियम पाळण्यास भाग पाडेल अशी रस्त्यांची आखणी करावी.

No comments:

Popular Posts