Tweet

Saturday, 23 April 2011

जेम्स लेन विरुद्ध नागरिकांचा संताप:

Add caption
 जेम्स हा अमेरिकेचा नागरिक आहे. अमेरिकेचा विश्वास लोकशाही प्रणालीवर आहे. परंतु, तो फक्त त्यांच्या देशात असताना. एकदाका हे बाहेर पडले की, ते साम्राज्यवादी, हुकुमशहा बनतात. या जेम्सने छत्रपति शिवाजी महारांजाविषयी पुस्तक लिहले. त्यामध्ये काय लिहले हे मला माहित नाही व बहुधा 99 टक्के लोकांना माहित नसावे.
माझा अंदाज आहे की त्याने महाराजांच्या निधीसंकलन मोहिमेबद्दल लिहले असावे. त्याने काय लिहले व काय लिहावयास पाहिजे होते हे तपासल्याशिवाय मत व्यक्त करता येत नाही. माझे मत गृहितिकावर अवलंबून आहे. महाराजांना स्वतःकरिता राज्य निर्माण करावयाचे नव्हते. त्यांना स्वराज्य पाहिजे होते. त्यांनी कोठलीही निवडणुक लढविली नव्हती तरी ते प्रजामान्य शासनप्रमुख होते, लोकिक अर्थाने राजे नव्हते. त्यांनी जे केले ते फक्त जनहित लक्षात घेऊन केले. त्यांची जनता अर्थातच स्वराज्याच्या सीमेत राहणारे लोक. महाराजांनी कधीही जुलुम-जबरदस्ती करून महसुल मिळवला नाही. ते राजे असते तर जबरदस्तीने महसुल वसुल केला असता. हे त्यांना क्षम्य असो अगर नसो पण त्या काळच्या रुढीप्रमाणे सर्वमान्यही होते. त्या काळी लढाया करणे, शत्रुच्या प्रदेशात जोरजबरदस्ती करणे वगैरे नित्य व्यवहार होता. मोगल सम्राट शासक असले तरी ते धर्मनिरपेक्ष नव्हते. प्रजेला न्याय देताना तो धर्माधारित होता. स्वतःच्या घरात कुटुंबप्रमुख सर्वाना एकसारखे वागवतो त्याप्रमाणे मोगलांचे वर्तन नव्हते. त्यामुळे ते परकीय होते. अशा परकीयांविरुद्ध महाराजानी युद्ध पुकारले. हे लक्षात ठेवले पाहिजे की, हे युद्ध मुसलमानांविरुद्ध नसून परकीयांविरुद्ध होते. महाराज हे स्वराज्याचे प्रतिक होते व आहेत. त्यांना चौकटीत बसवावयाचे असेल तर ती चौकट विश्वाचीच असावी. काही करंट्या लोकांनी स्वार्थापायी त्यांना महाराष्ट्राच्या किंवा हिंदूधर्माच्या तसेच मराठाजातीच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला. काही अंशी ते त्यात यशस्वीही झाले. खरे तर जेम्स लेनपेक्षा हे लोक मोठे गुन्हेगार आहेत. त्यांचे महाराजांवरील प्रेम हे सोंग आहे. जगात कोठेही काही झाले की त्याची प्रतिक्रिया भारतामधील काही ठिकाणी व्यक्त केली जाते. प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा राजरोस मार्ग वापरला जातो तो म्हणजे 'बंद' पुकारणे, 'सार्वजनिक मालमत्तेचे' नुकसान करणे वगैरे. आता विचार करा जर महाराष्ट्रात बस, रेल्वे, इमारती जाळल्या, रस्ते बंद केले, सर्व व्यवहार ठप्प केला तर त्या जेम्सला किती व कसा फरक पडणार? त्यांना खरोखरीच वाटत असेल की, हा महाराजांवर अन्याय आहे तर प्रथम त्यांनी ज्यांनी अन्याय केला त्यांना धडा शिकवला पाहिजे. शांततापूर्वक आंदोलन करायचे किंवा धरणे धरायचे तर ते जेम्सच्या घरापुढे धरा. त्याकरिता पैसे पाहिजेत तर हात पसरा क्षणात जनता तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देईल. अशा लोकांचे प्रेम महाराजांच्यावरील श्रद्धेमुळे नाही तर स्वतःकरिता प्रसिद्धी मिळवण्याकरिता, निवडणुकीत मते मिळविण्याकरिता केलेले सोंग आहे. शासनही त्याबद्दल कृती करण्याऐवजी निदर्शने कशी थोपवली हे सांगण्यात रमले आहे. राज्यशासनांने खरे तर हा प्रश्न केंद्रशासनातर्फे अमेरिकेबरोबर चर्चा करून सोडविला पाहिजे. त्या पुस्तकाच्या सर्व प्रति परत घेऊन त्यामध्ये सत्य माहिती छापून जगभर प्रसिद्ध केले पाहिजे. डोळे मिटून दूध पिणे, शेजाऱ्याला अपशकून करण्याकरिता स्वतःचे नाक कापून त्याला सामोरे जाणे या प्रकारावरच सर्वांचे लक्ष आहे. दुसऱ्या बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टाहो फोडण्यात काही कलाकार मग्न आहेत व त्यांना साथ देण्यास मानवाधिकार आयोग सज्ज आहे. जर हे चित्रकार स्वःला अद्वितीय मानत असतील तर इतरांच्या धर्मात ढवळाढवळ करण्याऐवजी स्वतःच्या धर्मातले विषय का निवडत नाहित? त्यांच्या धर्मांत काय कमी विषय आहेत? गेला बाजार आता ज्या देशाचे नागरिक झालेत तेथील बायांची चित्रे का काढत नाहित? तेथे त्यांची दातखिळी का बसते? त्यांनी मला भारतात सुरक्षित वाटत नाही म्हणून नव्वदी ओलांडल्यावर दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घ्यावे लागले असे विव्हळत बसू नये. हिंम्मत असेल तर त्यांच्या सध्याच्या देशातील बायांची चित्रे काढून दाखवावीत. अशांना विरोध करणारे मात्र निषेध करण्याकरिता स्वतःच्या देशात जाळपोळ करतात. मानवाधिकार आयोग हेही मोठे सोंग झाले आहे.

No comments:

Popular Posts