Tweet

Saturday, 23 April 2011

भारतापुढील धोके.

 समृद्ध भारत बनविण्याकरिता फक्त विकास हाच मुख्य मुद्दा मानणे म्हणजे डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजरासारखे आहे. विकासाबरोबर सुरक्षित भारत हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्या करिता भारतापुढचे धोके कोणते हे जाणणे महत्त्वाचे आहे. ते माहित झाले तर निदान उपाययोजना करण्याकरिता विचार होऊ शकतो.
देशाला हानी पोहचवणारे कित्येक अंतर्गत शत्रू आहेत. बाहेरील अतिरेक्यांना मदत करणारे, धर्माच्या नांवाखाली दुष्कृत्ये करणारे (या मध्ये मुख्यतः खालिस्तानी, मुजाहिदीन व हिंदुत्त्ववादी यांचा समावेश होतो. याचा अर्थ त्या धर्मांतील 100 टक्के लोक असा नव्हे तर कांही शेकड्यात मोजता येणारे), साम्यवादी (यामध्ये नक्षलवादी व मार्क्सवादी मोडतात), भ्रष्टाचारी, कामचोर वगैरे. बाहेरून धोकादायक शत्रू म्हणजे तालीबानी, चिनी, पाकिस्तानी, एलटीटीई, घुसखोर वगैरे. या सर्वांचा बंदोबस्त झाला तरच भारत सुरक्षित होईल व भारताचा विकासदर द्वैअंकी होईल.
जो पर्यंत तालीबान भारतात स्फोट घडवित आहे तो पर्यंत पाकिस्तान भारताशी युद्ध पुकारणार नाही. युद्ध न करिता भारताला पदोपदी हरविण्याकरिता पाकिस्तानने हा उपाय शोधला आहे. तो ते उत्तमप्रकारे राबवितही आहेत. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तालीबान केवळ पाकिस्तानच्या मदतीवर अवलंबून नाही. जर भारतीयांनी त्यांना मदत करणे सोडले तर तालीबानला कोठेही यश मिळणार नाही. तीच गत चीनची. भारताला भारतातल्याच जनतेकडून परास्त करण्याकरिता चीन साम्यवाद्यांच्याकरवी हल्ले करतो. त्यामध्ये पाकिस्तानसारखे स्वतःचे नागरिक वापरत नाही. आपली स्थिती अशी आहे की, मुख्यतः इस्लामी जगताशी आपण शत्रुत्त्व पत्करू शकत नाही. तेलाकरिता त्या जगताशी सौह्र्याद्रपूर्ण संबंध ठेवणे अति आवश्यक आहे. भारताने धर्मनिरपेक्षितेला मान्यता दिली आहे. हे एक मोठे साधन आपल्या हाती आहे. त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे राजकीय पक्ष त्याचा उपयोग जनतेला गाजर दाखवून मते मिळविण्याकरिता करतात.
धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ सर्वसाधारपणे सर्वधर्मसमभाव असा घेतला जातो. माझ्यामते त्याचा अर्थ कोठलाही निर्णय घेताना व्यक्तिच्या धर्माचा विचार करू नये असा घ्यावा. म्हणजेच जे काय करावयाचे ते धर्माचा विचार न करता रा़ष्ट्राचा विचार करून करावयाचे. राष्ट्राकरिता एखादे कृत्य करणे आवश्यक असेल तर ते धर्मबंधनांचा विचार न करता करणे. याप्रमाणे विचार केला तर तथाकथित धर्मनिरपेक्षता मानणारे कित्येक राजकारणी अडचणित सापडतील. तरी सुद्धा राष्ट्रहितापुढे त्यांच्या अडचणीकडे लक्ष देऊ नये. खरे म्हणजे कांही धर्मांधपक्षानी धर्मनिरपेक्षता स्वीकारली तर धर्मनिरपेक्षितेचा बुरखा पांघरणारे अडचणीत येतील. (पुढे चालू)
भारताच्या राज्यघटनेने सर्वांना समान वागणुक देण्याचे मान्य केले आहे. असे असताना राष्ट्राचे बहुसंख्यांक-अल्पसंख्यांक असे वर्गिकरण करणे हे घटनाबाह्य आहे. सर्वांना त्यांचा धर्म न पाहता न्याय देणे हे शासनाची जबाबदारी व कर्तव्य आहे. याचा अर्थ बहुसंख्यांक-अल्पसंख्यांक हे वर्गिकरण चूक आहे. अल्पसंख्यांक म्हणून कोणाला विशिष्ठ सवलती देणे हे बहुसंख्यांकांवर अन्यायकारक आहे.
आता मुख्य मुद्याकडे वळू या. सर्वात धोका सद्यस्थितीत निरनिराळ्या अतिरेक्याकडुन आहे. सर्वप्रथम इस्लामिक जगतातील अतिरेक्याबद्दल विचार करू. हे अतिरेकी एका विशिष्ठ विचारसरणीच्या आहारी गेले आहेत. त्यांना पैशाचेही पाठबळ आहे. हे अतिरेकी सापासारखे आहेत. त्यांच्या शेपटीवर पाय देण्याआधी मुळातुन विचार करुन यशाकडे वाटचाल करणे अत्यावश्यक आहे. हे सर्व अतिरेकी इस्लामचा आधार घेऊन बनवले आहेत. त्याना लहानपणापासून शिकवण देऊन कट्टर धर्मांध केले आहे. त्यांचे अर्थकारण गांजा-अफू-चरस वगैरेंच्या विक्रिवर, सौदी अरेबिया सारख्या देशानी दिलेल्या मदतीवर, पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळालेली मदत त्यांचेकडे वळवण्यावर अवलंबून आहे. पैसे मिळविण्याकरिता आता इंटरनेटचाही उपयोग करित आहे. पाकिस्तानच्या मदतीने Songs.pk ही वेबसाईट चालविली जाते. तीवर काल रिलीज झालेल्या सिनेमाची गाणी डाऊनलोड करून घेता येतात. ते पैसे या अतिरेक्यांना मिळतात. हे पैसे थोडेथोडके नाहित तर रोज अंदाजे 12 कोटी वर आहेत. ते आणखी एक शक्कल लढवत आहेत. लोकाना आयकरातून परतावा मंजूर झाला आहे असे ई-मेलने कळवतात. तो मिळण्याकरिता आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्याकरिता कडी देतात. या कडीवर टिचकी मारल्यावर हुबेहुब आयकर विभागाची वेबसाईट दिसते. त्यामध्ये परताव्याची रक्कमही दिसते. अर्जामध्ये बँक अकाँट क्रमांक, क्रेडिटकार्ड क्रमांक तसेच एटीएम क्रमांक पासवर्डसह मागितले जातात. याचा परिणाम मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांना प्रशिक्षण देण्याकरिता पाकिस्तानी सेना व इंटर सर्विसेस इंटेलिजन्स पाकिस्तान एका पायावर तयार आहेत. हे सगळे आहे. त्यावर कडी म्हणजे भारतातील काही नागरिक त्यांना मदत करतात. या मदतीशिवाय ते स्वतःला पंगु समजतात. ही मदत थांबली तर त्यांचे बहुतांश प्रयत्न अयशस्वी होतील. काही भारतीय असेही आहेत की त्यांना माहिती असते परंतु ती माहिती योग्य ठिकाणी वेळेवर पोहचवली जात नाही. त्यामध्ये त्याच्या मनात भिती असते तसेच कांहींना मनातून आनंद होतो. हे सर्व विचारात घेऊन उत्तर शोधले पाहिजे. आणखीही या मध्ये भर घालू शकता.
या वरून असे दिसून येते की, अतिरेकी बनविण्याचा कारखाना बाल वयांतील मुलांना घेऊन सुरू होतो. त्यांचेमध्ये इस्लामबद्दल नुसते प्रेमच नाही तर अंधविश्वास भरविला जातो. त्यांना इतके वेडे केले जाते की, त्यांना इस्लामशिवाय जगात इतर गोष्टी आहेत याचे भानच राहत नाही. इतकेच काय इस्लामची परिपूर्ण माहिती देण्याऐवजी फक्त "जगात इस्लामशिवाय इतर काही नाही. जगातील इस्लाम शिवाय इतर प्रत्येक धर्माचा प्रत्येकजण शत्रू आहे व त्याचा विनाश केला पाहिजे" एवढेच शिकवले जाते. अशा प्रकारे त्यांची मानसिकता घडवून त्याना कोठलीही अमानुष कृत्ये करण्यास तयार केले जाते. तरुण झाल्यावर त्याना घातपाती कृत्ये करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यानंतर कळसुत्री बाहुल्याप्रमाणे त्यांचा वापर केला जातो. त्या करिता लागणारे पैसे विविध प्रकारे गोळा केले जातात. इस्लामच्या नांवाखाली भारतातील नागरिकांना मदत करण्यास प्रवृत्त केले जाते. या विरुद्ध लढा देण्याकरिता पाकिस्तान व इतर देशातील फक्त प्रशिक्षण केंद्रें उधवस्त करून चालणार नाही. शत्रूची हत्यारे त्यांच्या विरुद्ध वापरावी लागतील. निदान भारतातील सर्व शाळांमध्ये माणूस हा मुद्दा मुख्य मानून धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हे बालवयातच शिकवले पाहिजे. धर्माचे शिक्षण आवश्य द्यावे परंतु, ते परिपूर्ण असावे. नीती मूल्ये शिकवावीत परंतु, सर्व धर्मांचा आदर करण्यास शिकवावे. अतिरेक्यांचा पैशांचा स्रोत आटवण्याकरिता जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. सर्व धर्मियांना धर्मनिरपेक्ष बनवावे. जे हे मानणार नाहित त्यांना फक्त एकच शिक्षा द्यावी. ती म्हणजे मृत्युदंड.

भारतामध्ये दहशतवाद रोखण्याकरता उपाय?

आतापर्यंत दहशतवादाविरुद्ध तात्पुरते उपाय केले आहेत. दहशतवाद ही खोल जखम आहे. खरचटले तर थोडी मलमपट्टी केली तर निभाऊन जाते. खोल जखमेवर मूळापासून शोध घेऊन, त्याची कारमीमांसा करून जहाल उपाय करण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे. प्रथम प्रश्न विचारले पाहिजेत, प्रत्येक प्रश्नाचे खोलात जाऊन विवरण केले पाहिजे, उत्तरे शोधताना इतराना विचारले पाहिजे, जगाचा अनुभव अभ्यासला पाहिजे, स्वतःची ताकद लक्षात घेतली पाहिजे व त्यातून उपाय शोधला पाहिजे. ही समस्या जवळ जवळ पाव शतक भारताचा पिच्छा पुरवत आहे. ती सोडवण्याकरता 4-5 वर्षे किंवा जास्त काळही लागेल. परंतु उपाय असा पाहिजे की या समस्येने निदान शे-दोनशे वर्षे डोके वर काढू नये. खूप प्रश्न विचारण्यासारखे आहेत. या प्रशनांची उत्तरे शोधताना नवीन प्रश्न पुढे येतील. नव्या प्रश्नांची उत्तरे शोधताना आणखी प्रश्नांना तोंड द्यावे लागेल. अर्थात प्रश्न विचारण्याला मर्यादाही घालावी लागेल. विचार करण्यावरही वेळेचे बंधन ठेवावे लागेल. तसे न केले तर काळाच्या ओघात काही प्रश्न संदर्भहीन होतील व नवे प्रश्न भेडसाऊ लागतील.
प्रथम दर्शनी समोर दिसणारे प्रश्न म्हणजे दहशतवादी निर्माण का होतात? त्यांना कोण निर्माण करतो? त्यांचे भरण पोषण कोण करतो? त्यांना मदत कोठून मिळते? ते यशस्वी का होतात? बिमोड करताना हाताचे दुखणे पायात न जाता कोठले व कसे उपाय करावेत? प्रत्येक प्रश्नाची उकल करताना नवीन प्रश्न समोर येतील व त्यावरही उपाय करावा लागेल.
सर्व प्राणीमात्र गट करून राहतात. गटात राहिल्याने शक्ती वाढते, संकटांना तोंड देता येते. पुराणकाळापासून धर्म या संकल्पनेने असे गट बांधले गेले. वर्तमानकाळात ही संकल्पना कालबाह्य झाली असली तरी स्वतःचे महत्व शाबूत राखण्याकरता धर्ममार्तंड ही संकल्पना सुधारण्याकरता विरोध करतात. जनतेचे त्यात अहित असले तरी अंधश्रद्धेमुळे जनता ती सोडावयास तयार नाही व जनतेला कोणी सुधारक भेटत नाही. भारतामध्ये जेवढे धर्म स्थापन झाले त्या मागे 'अहिंसा' हे एक तत्व समाईक आहे. या तत्त्वामुळे भारत हे सदासर्वकाळ एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून नांदत आहे. भारताबाहेर स्थापन झालेल्या धर्मामध्ये हे तत्त्व दिसत नाही. याचे मुख्य कारण भारतामध्ये 'त्यागा' ला असलेले महत्त्व. भारताबाहेरील सर्व प्रदेशात 'उपभोगा' ला महत्त्व आहे. पाश्चात्य राष्ट्रांची तथाकथित प्रगतीमागे हेच रहस्य असावे. परंतु, त्यामुळे त्याना कधीही शांतता लाभली नाही व लाभणार नाही. पाश्चात्य राष्ट्रानी आशियातील राष्ट्रांचे शेकडो वर्षे शोषण केले. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर अमेरिका व ब्रिटन या राष्ट्रानी तेलसमृद्ध राष्ट्रांचे शोषण चालू ठेवले. या राष्ट्रांतील प्रचलित धर्म म्हणजे कडक कायदे. मनुष्य शिक्षेच्या भीतीनेच स्वतःवर ताबा ठेऊ शकतो या पायावर हा धर्म उभा आहे. ज्या काळात हा धर्म स्थापला त्यावेळच्या परिस्थितीनुरुप अशा कायद्यांची अत्यंतिक आवश्यकता होती. परंतु, वर्तमान परिस्थितीनुरुप त्यामध्ये बदल आवश्यक आहेत हे मानण्याकरता धार्मिक पुढारी तयार नाहीत. निदान भारतीय उपखंडातील माणूस वेगळा आहे हे तरी त्यानी मान्य केले पाहिजे.
शोषणाच्या विरोधात बंड करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. हा हक्क बजावणारे स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जातात. भारतामध्ये इंग्रजाविरुद्ध भारतीयानी बंड केले. त्याना शेकडो विचारी पुढारी मिळाले. पुढाऱ्यानी भारत एक राष्ट्र म्हणून जनतेला एकत्र आणले. त्या मध्ये प्रत्येक भारतीयाची ओळख भारताचा नागरिक म्हणून निर्माण केली. त्यामुळे या बंडाला स्वातंत्र्य युद्ध म्हणण्यास कोठलाही प्रत्यवाय नाही. परंतु तेलसमृद्ध राष्ट्रांमध्ये हे घडले नाही. धार्मिक नेत्यानी जनतेतील असंतोषाचा फायदा स्वार्थासाठी घेतला. तेथील जनतेला धर्माचे बंधन घालून एकत्र आणले. प्रत्येक मनुष्याला (विशेषतः मुले-मुली व तरुण-तरुणी ना) धर्मांध बनवले. धर्माकरता जगणे व मरणे हेच जीवनाचे ध्येय असल्याचे त्यांच्या मनात बिंबवले. यांच्या आधारे बंड केले. समोरा-समोर युद्ध करणे अशक्य असल्याने गनिमीकाव्याने युद्ध सुरू केले. या युद्धामध्ये जास्तीत जास्त नुकसान करणे, प्राणहानी करणे व धर्माचा प्रसार सर्व पृथ्वीवर करणे हे ध्येय ठेवले. मेला तर स्वर्ग व जगला तर पृथ्वीचे राज्य या प्रकारचे मधाचे बोट दाखविले. मदरशांचा पूरेपूर दुरुपयोग करून घेतला. धर्माच्या नांवाखाली मृत्युला कवटाळणारे, विद्ध्वंस करणारे, तसेच खुनी माणसे तयार केली. परंतु, अमेरिका तसेच ब्रिटनच्या सार्मथ्यापुढे ही ताकद निष्प्रभ ठरली.
खरे तर भारताने कोठल्याही देशाचे वा मुस्लिम धर्माच्या मनुष्याचे शोषण केले नाही. तरीही भारताला याचा फटका गेली कित्येक वर्षे बसत आहे. गेल्या 25 वर्षात तर या समस्येने कहर केला आहे. असे का व्हावे हे समजण्याकरता भारताच्या गेल्या हजार वर्षांच्या इतिहासाची पाने अभ्यासली पाहिजेत. भारतावर पुरातन काळापासून आक्रमणे झाली. पुष्कळ काळ ही आक्रमणे लुटीच्या उद्येशाने झाली. मूल्यवान वस्तूंची लूट घेऊन आक्रमक आले तसे परत गेले. नंतरच्या काळात आक्रमक  भारतात ठाण मांडून बसले. हळूहळू ते भारतीय झाले. त्यामुळे त्याना हाकलुन देण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. दक्षिण भारतामध्येही त्यानी हातपाय पसरले. दक्षिण भारतातले मुसलमान दक्षिण भारतीय झाले. त्यानी कित्येक वर्षे स्थानिकांच्या मदतीने राज्य केले. ज्यावेळी त्यानी हिंदूधर्मावर आक्रमण केले त्याना विरोध झाला. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजानी सर्वधर्मसमावेशक स्वतंत्र राज्य निर्माण केले. हिंदू (भारतात स्थापन झालेल्या सर्व धर्माचे लोक) व मुसलमान कित्येक वर्षे एकमेकाशी जुळवून घेत आनंदाने राहिले. युरोपातील व्यापाऱ्यानी कावेबाजपणे भारतावर आक्रमण केले. हिंदू मुसलमान नुकतेच एकत्र राहवयास शिकले होते त्यांना एकमेकांचे शत्रू बनवले. मुसलमानांना तुम्ही राज्यकर्ते आहात असे भासवले तर हिंदूना मुस्लिम तुमच्या धर्माचे शत्रू आहेत असे पटवून दिले. इंग्रजांचे राजकरण यशस्वी झाले. हिंदू मुसलमान एकमेकाशी भांडत राहिले व इंग्रज भारताला लुटत राहिले. स्वातंत्र्याकरता लढताना मुसलमान नेत्यांमध्ये भारतावर राज्य करण्याची आकांक्षा निर्माण झाली. परंतु हे साध्य होणे अशक्य वाटल्याने मुसलमान पुढाऱ्यानी धर्माधिष्ठित राज्याची कल्पना मांडली व त्यातून पाकिस्तानची निर्मिती झाली.
मुस्लिमधर्म राष्ट्र ही संकल्पना मानत नाही. विश्वातील सर्व प्राणीजात हे फक्त अल्लाचे बंदे आहेत व धर्म राष्ट्राच्या सीमेमध्ये बांधता येत नाही असे मानतो. सहिष्णुता व बंधुत्त्व हे फक्त इतर मुसलमानांकरता असते व इतर सर्व हे शत्रू आहेत अशी शिकवण दिली जाते. विश्वातील सर्वानी मुस्लिमधर्म स्वीकारला तर बंधुत्त्व स्थापन होऊन सर्वदूर शांतता नांदेल असा भ्रम धर्मगुरू म्हणवणारानी निर्माण केला. या उलट हिंदू, राष्ट्र ही संकल्पना मानतात. धर्मांतराची आवश्यकता मानत नाहीत. प्रत्येक धर्मियाने राष्ट्राकरता जगावे अथवा मरावे अशी त्यांची श्रद्धा आहे. या विचारसरणीला तडा देणारे हिंदूमध्ये गेल्या 2 शतकांत निर्माण झाले. त्यानी भारतराष्ट्र या ऐवजी हिंदूराष्ट्र ही संकल्पना राबवण्यास सुरवात केली. हिंदू धार्मिक नेत्यानी त्याला खतपाणी घातले. त्याकरता 'धर्मांतर' त्यांच्या मदतीला आले. जबरदस्तीने अथवा अमिष दाखवून केलेल्या धर्मांतराने हिंदूंमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली व त्यातूनच अशा पुढाऱ्यामागे हिंदंू धावू लागले. पाकिस्तानात मुस्लीम सोडून इतर धर्मियांची दयनीय अवस्था पाहून हिंदू-मुस्लीम द्वैराष्ट्रवाद बळकट झाला. यावर उपाय करण्याची संधी दोन वेळा भारताला मिळाली (1965 व 1971) परंतु, भारताच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाने कच खाल्ली व संधीचे सोने झाले नाही. वर्तमान काळात अमेरिकेचे तसेच चीनचे हितसंबंध पाकिस्तानमध्ये गुंतले असल्याने हे काम अवघड नाही तर अशक्यप्राय झाले आहे.
अशा पार्श्वभूमीवर मदरशे व शाखाना ऊत आला. अतिरेक्यानी केलाल्या कोठल्याही हल्ल्यानंतर इस्लामचे पुढारी सांगत सुटतात की, निरापराध्याना मारणे इस्लामविरोधी आहे, जे हे कृत्य करतात ते मुसलमान नव्हेत, अमुक ठिकाणी लिहल्याप्रमाणे हे इस्लामविरोधी आहे वगैरे. परंतु हे मदरशांत शिकवले जात नाही. अशी कृत्ये करणारांना धर्मातून बहिकृत केले जात नाही. मुंबईवर झालाल्या हल्ल्यात मेलेल्या अतिरेक्यांच्या शवांना मुसलमानांच्या दफनभूमित दफन करण्यास विरोध दर्शवून मुसलमान संघटनांनी चांगला पायंडा पाडला आहे. हेच तत्त्व विस्तारून या संघटनांनी मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणात सुधारणा घडवून आणाव्यात. राष्ट्र या संकल्पनेचा शिक्षणात अंतर्भाव करावा. मुसलमानधर्माशिवाय इतर धर्म अस्तित्वात आहेत व ते तितकेच पूजनीय आहेत हे ठसवावे. इतरही स्वतःला अल्लाचा बंदाच मानतात परंतु ते अल्लाला वेगळ्या नांवाने ओळखतात हे समजाऊन सांगावे. भारताचा शत्रू, जरी तो मुसलमान असला तरी, तो माझा शत्रू अशा घणाचे घाव सर्वांच्या मनावर घालावेत. आर्थिक  व वैज्ञानिक प्रगती आवश्यक आहे व त्याकरता योग्य शिक्षण कसे अनिवार्य आहे हे पटवून द्यावे. धार्मिक शिक्षण हे मनःशांतिकरता व विज्ञान शिक्षण भौतिक प्रगतीकरता अशी वर्गवारी प्रत्येकाच्या मनावर बिंबवावी. शाखांनी हिदू कसे श्रेष्ठ आहेत, जे आजकाल दिसते ते आमच्या पूर्वजांना हजारो वर्षापूर्वी माहित होते, मुसलमान-ख्रिश्चन हिंदूंचे शत्रू आहेत, मुसलमानांनी अमूक केले म्हणून हिंदंूनी तमूक केले, मुसलमानांनी केलेली विद्ध्वंसक कृत्ये कशी नीच आहेत परंतु हिंदूंनी तसल्याच प्रकारची केलेली कृत्ये ही केवळ प्रतिक्रिया आहे, 8 शतके मुसलमानांनी अत्याचार केले त्याचा बदला घ्या व अशाच प्रकारचे विचार विसरून जावेत व त्याचा प्रसार करू नये. शत्रूत्वाचा वारसा पुढे चालवू नये. काळात झालेला बदल लक्षात घेऊन भारतीय मूल तत्त्व अहिंसा याचा वापर करून अफगाणिस्तानसह सार्कचे सभासद हिंदू आहेत या संकल्पनेचा प्रसार करावा.
राजकारण्यांनी तसेच राजकीय पक्षांनी धर्मनिरपेक्षच राहिले पाहिजे मग ते कोठल्याही पक्षाचे असोत. 'जगन्मिथ्या' हे तत्त्व सत्य मानले तरी भोक्तिक प्रगतीकरता धर्माचा उपयोग किती या प्रश्नाचे उत्तर शोधावेच लागेल. केवळ एका धर्माच्या अगर वंशाच्या अथवा भाषेच्या किंवा उतर निकष लावून जनतेला एकत्र आणण्याऐवजी भारताचा नागरिक म्हणून प्रत्येकाला एका माळेत गुंफावे. असे ऐक्य घडवून आणले तरच भारत हे राष्ट्र सर्वशक्तिमान होईल हे समजून घ्यावे.
पहिले कारण गुप्तहेर यंत्रणांचा सुस्तावा व दुसरे कारण स्थानिकांची (भारतीय नागरिक) मदत. नरीमन हाऊसमध्ये 100 किलो मटनाची ऑर्डर येते त्याचा गुप्तहेर यंत्रणाना पत्ता लागत नाही व मटण विक्रेत्याला संशय येत नाही. दहशतवादी भारतीय छोट्या नौकेचा उपयोग मुंबईत प्रवेश करण्याकरता करतात. नौकाचालकाला संशय येत नाही. राहण्याची व्यवस्था कोणी स्थानिकानेच केली असेल. हे लक्षात घेतले पाहिजे की, स्थानिकांच्या मदती शिवाय दहशतवादी कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. गुप्तहेर यंत्रणानी डोळे व कान उघडे ठेवले तर दहशतवादी त्यांच्या कृती पूर्वीच पकडले जातील. हे टाळण्याकरिता नवीन कायदे बनवण्याची आवश्यकता नसली तरी शिक्षेची तरतूद बदलण्याची आत्यंतिक गरज आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तहेर यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे पगार निम्मे करावेत व उच्च पदस्थाना सक्तीने निवृत्त करावे. जे स्थानिक माहितीकडे कानाडोळा करतात अथवा पोलिसांना माहिती देत नाहित त्याना आजन्म कारावासाची शिक्षा द्यावी. जे स्थानिक प्रत्यक्ष मदत करतील त्याना मरेपर्यंत फाशी द्यावे. न्याय देताना 'निरापराध्याला शिक्षा झाली तरी चालेल पण अपराधी सुटला नाही पाहिजे' हे तत्त्व पाळावे. एवढे केले तर दहशतवादी कधीही यशस्वी होणार नाहित.

भारतामध्ये दहशतवादी यशस्वी का होतात?
आतापर्यंत दहशतवादी पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. यशस्वी होण्यामागे  दोन कारणे महत्त्वाची आहेत. पहिले कारण गुप्तहेर यंत्रणांचा सुस्तावा व दुसरे कारण स्थानिकांची (भारतीय नागरिक) मदत. नरीमन हाऊसमध्ये 100 किलो मटनाची ऑर्डर येते त्याचा गुप्तहेर यंत्रणाना पत्ता लागत नाही व मटण विक्रेत्याला संशय येत नाही. दहशतवादी भारतीय छोट्या नौकेचा उपयोग मुंबईत प्रवेश करण्याकरता करतात. नौकाचालकाला संशय येत नाही. राहण्याची व्यवस्था कोणी स्थानिकानेच केली असेल. हे लक्षात घेतले पाहिजे की, स्थानिकांच्या मदती शिवाय दहशतवादी कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. गुप्तहेर यंत्रणानी डोळे व कान उघडे ठेवले तर दहशतवादी त्यांच्या कृती पूर्वीच पकडले जातील. हे टाळण्याकरिता नवीन कायदे बनवण्याची आवश्यकता नसली तरी शिक्षेची तरतूद बदलण्याची आत्यंतिक गरज आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तहेर यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे पगार निम्मे करावेत व उच्च पदस्थाना सक्तीने निवृत्त करावे. जे स्थानिक माहितीकडे कानाडोळा करतात अथवा पोलिसांना माहिती देत नाहित त्याना आजन्म कारावासाची शिक्षा द्यावी. जे स्थानिक प्रत्यक्ष मदत करतील त्याना मरेपर्यंत फाशी द्यावे. न्याय देताना 'निरापराध्याला शिक्षा झाली तरी चालेल पण अपराधी सुटला नाही पाहिजे' हे तत्त्व पाळावे. एवढे केले तर दहशतवादी कधीही यशस्वी होणार नाहित.

अतिरेकी, माओवादी, नक्षलवादी यांचे उच्चाटन:

तसे पाहिले तर हे सर्वच अतिरेकी याच सदरात मोडतात. यांचा निःपात केलाच पाहिजे. त्याकरिता मार्ग योग्य पाहिजे. विशिष्ठ पोलिसदल बनवून हे साध्य होणार नाही. राक्षसाला देवाने वरदान दिले व त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नविन राक्षस निर्माण होऊ लागले. सध्या विशिष्ठ विचारसरणीचे वरदान अतिरेक्यांच्या पाठीशी आहे. कितीही अतिरेकी मारले तर त्यांपेक्षा कितीतरी नवीन अतिरेकी निर्माण होत आहेत. अमेरिकन मॉडेलची सर्वच स्तुती करतात. जवळ जवळ सर्वाना त्या मॉडेलचे आकर्षण आहे. परंतु हे मॉडेल चिरायु नाही. निदान भारताने तरी ते अंतिम उपाय म्हणून स्वीकारू नये. भारतीय संस्कृतीत विचार प्रबोधनाला जास्त महत्व आहे व तोच उपाय टिकाऊ आहे. स्वातंत्र्यलढ्यांत सर्वप्रथम जनतेमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान वगैरे जागृत केले. त्यमुळे जनता जिवावर उदार होऊन स्वातंत्र्यलढ्यांत सामील झाली. धार्मिक अतिरेकी हेच करत आहेत. माओवादी व नक्षलवादी संपत्ती हा विचार घेऊन लोकांना दुष्कृत्ये करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यांच्या विरुद्ध लढा देताना याचा विचार व्हावा. हे शिक्षण नुकत्याच उपजलेल्या मुलापासून चालू केले पाहिजे. शिक्षण कसे द्यावयाचे या करिता भारतभर उघड चर्चा झाली पाहिजे. त्यामध्ये सर्व धर्मांच्या धार्मिक गुरुंनाही सामील करून घ्यावे. एकदा निर्णय घेतल्यावर त्याला थोड्या लोकांनी विरोध केला तरी त्यांना भीक घालू नये. एक महत्वाची गोष्ट. अतिरेक्यांपेक्षा त्यांना मदत करणारे जास्त धोकादायक असतात. एक वेळ अतिरेकी परवडले पण त्यांना मदत करणारे ओळखणे अवघड. शिक्षण असे असावे की, अतिरेक्यांना मदत करणे हे महत्पाप समजले जावे. हा राष्ट्रद्रोह तर आहेच तसाच तो धर्मद्रोहही समजावा. हे काही धर्मांत नाही तर सर्वच धर्मात समजले जावे. व असे करणाराला वाळीत टाकणे, जन्मठेप, फाशी अशा शिक्षा असाव्यात. तसेच निश्चित केलेल्या उपायाविरुद्ध वक्तव्य करणारांनाही अशीच शिक्षा असावी. ही शिक्षा अमंलात आणताना कोणाचीही गय करू नये, तो एकाधा धर्मगुरु अगर राजकीय नेता असला तरी. अमेरिकन मॉडेल ही तात्पुरती उपाय योजना आहे व ती त्याच हेतुने आवश्य अंमलात आणावी. किंबहुना त्याकरिता स्वतंत्र सुरक्षादळ निर्माण करावे.

अमेरिकेवर कितपत विश्वास ठेवावा!

अमेरिकेमुळे भारताला फायदे झाले आहेत. परंतु, हे फायदे मैत्रीमुळे झाले असे म्हणता येणार नाही. अमेरिका जे करते ते स्वतःकरता. मित्राला फायदा व्हावा हा अमेरिकेचा उद्येश कधीही नसतो. फायदा होत असेल तर तो एक बायप्रॉडक्ट असतो. भारतीय संस्कृतीत मित्राकरिता आवश्यकतेनुसार प्राण देणे सुद्धा अभिप्रेत आहे. अमेरिकेत ते नाही. यामुळेच पाकिस्तान अमेरिकेकडून मदत घेतो व ती भारताविरुद्ध वापरतो. अमेरिकेला त्यामध्ये काही गैर वाटत नाही. अमेरिकेला छळणाऱ्या अतिरेक्यांवर जो पर्यंत पाकिस्तान कारवाई करत आहे तो पर्यंत अमेरिका मदत देत राहणार, मग ती मदत भारताविरुद्ध वापरली तरी. आपला समज आहे की, अमेरिका इस्राईलला मित्र मानते. तिने इस्राईलला भरपूर मदत केली व करत आहे. परंतु उद्या अरबराष्ट्रातील तेल संपले तर हीच अमेरिका इस्राईलला मदत करणे बंद करेल. अरबानी संपूर्ण इस्राईल भस्म केले तरी ती ब्रही काढणार नाही. उलट ते करण्याकरता लागणारी शस्त्रे पैसे घेऊन अरबाना पुरवेल.
हे लक्षात घेऊन भारताने स्वतःचे रक्षण करण्याकरिता सिद्ध झाले पाहिजे. आपल्याला निरनिराळ्या आघाड्यावर लढणे भाग आहे. गरीबी, संपत्तीची भारतीयांतील असमान वाटणी, नक्षलवादी, माओवादी, शेजारील राष्ट्रे व आपला मोठा शत्रू चीन. पाकिस्तानकडे 60 अणुबाँब आहेत. पाकिस्तान ते सर्व भारताविरुद्धच वापरणार. असे काही होण्याआधी पाकिस्तानला धडा शिकवणे अपरिहार्य आहे. नक्षलवादी-माओवादी यांच्याविरुद्ध श्रीलंकेने जशी लिट्टेविरुद्ध कारवाई केली तशी करणे आवश्यक आहे. या सर्व आघाड्यांवर लढण्याकरिता भारताने स्वतःची ताकद वाढवली पाहिजे. भारतात सुराज्य स्थापन झाले पाहिजे. वेळ येताच एकावेळी एका शत्रूला गाठून त्याचा नायनाट केला पाहिजे. भारत शक्तीमान झाला तरच आपण सर्व शत्रूंशी दोन हात करून यशस्वी होऊ शकतो.

No comments:

Popular Posts